Javed Akhtar And Gulzar Esakal
मनोरंजन

Javed Akhtar And Gulzar: "एक लड़की को देखा तो" गुलजार अन् जावेद अख्तर यांचा फनी व्हिडिओ व्हायरल..

ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर आणि गुलजार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर आणि गुलजार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गुलजार हे त्याचे मित्र जावेद यांच्यासाठी एक कविता ऐकवत आहे. यादरम्यान दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्साही समोर आला.

जावेद अख्तर आणि गुलजार यांची पहिली भेट 1971 मध्ये रमेश सिप्पी यांच्या 'अंदाज' चित्रपटादरम्यान झाली होती. सोमवारी गुलजार यांनी “जादूनामा” या पुस्तकाचे प्रकाशन केलं, ज्याचं शीर्षक अख्तर यांच्या 'जादू' या टोपण नावावरून घेण्यात आले आहे. 'जदुनामा' या पुस्तकात अख्तर यांच्या जाहीर भाषणं, मुलाखती आणि त्यांनी केलेल्या विधानांच संकलन आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये गुजलार म्हणतात की, 'तुम्ही तर लिहून दिलं .. एक लड़की को देखा तो ऐसा लगा पण प्रत्येक कडव्याला असं वाटतं की ती दुसरी मुलगी आहे पहिली नाही' गुलजारसाहेबांचे बोलणे ऐकून जावेद अख्तर जोरजोरात हसायला लागतात. त्यानंतर गुलजार त्यांची एक कविता ऐकवतात.

एकीकडे, अख्तर यांनी “अंदाज”ची पटकथा लेखक आणि त्याचेसोबती सलीम खान यांच्यासोबत लिहिली, तर गुलजार यांच्यावर त्याचे संवाद लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. या चित्रपटात शम्मी कपूर, हेमा मालिनी, राजेश खन्ना आणि सिमी गरेवाल यांच्या भूमिका होत्या.

हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

जावेद अख्तर या कार्यक्रमात म्हणाले, “गुलजार साहब संवाद लिहीत होते आणि आम्ही पटकथा लिहित होतो. हा चित्रपट हिट झाला आणि गुलजार साहब आणि मी चांगले मित्र झालो. आम्ही अनेकदा भेटत नाही पण जेव्हाही भेटतो तेव्हा तासनतास बोलत असतो.” अख्तर यांनी सांगितले की, ते दोघे अजूनही एकमेकांना पत्र लिहितात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT