Javed Akhtar Controversial statement never ending debate for muslim women common civil code Google
मनोरंजन

Javed Akhtar Controversy: 'बायकांनाही एकपेक्षा अधिक पती..."; जावेद अख्तर घसरले

जावेद अख्तर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडतात. समान नागरी कायद्या विषयीच्या त्यांच्या नवीन वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ उडाली आहे.

प्रणाली मोरे

Javed Akhtar Controversy: जावेद अख्तर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ओळखले जातात. पण अनेकदा त्यांची ही वक्तव्य त्यांना भारी पडतात. त्यांच्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा मोठा वाद छेडला आहे. कॉमन सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायद्या विषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. (Javed Akhtar Controversial statement never ending debate for muslim women common civil code)

एका मुलाखतीत समान नागरी कायद्याचा अर्थ समजावून सांगताना जावेद अख्तर म्हणाले की, ''मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. जेव्हा मला माझ्या संपत्तीचे वाटे करायचे असतील तेव्हा मी त्याचे दोन समान वाटे करणार''. जावेद अख्तर पुढे म्हणाले की,'' समान नागरी कायद्याचा अर्थ केवळ सर्व समाजासाठी एक कायदा असणं असा नाही होत तर महिला आणि पुरुषांसाठी देखील एक समान कायदा हवा''.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

जावेद अख्तर आपल्या लिखाणामुळे लोकांचं मन जिंकताना आपण पाहिलं आहे पण अनेकदा त्यांच्या याच टोकदार शब्दांनी लोकांच्या भावना दुखावताना देखील आपण पाहिलं असेल. जावेद अख्तर बोलले की जर पुरुषांना एकाहून अधिक पत्नी ठेवण्याचा अधिकार दिला गेला आहे तर महिलांना देखील एकहून अधिक पती ठेवण्याचा अधिकार द्यायला हवा. जर असं केलं नाही तर मग महिलांना-पुरुषांना आपण समान हक्क दिले आहेत असं कसं आपण म्हणू शकतो''. जावेद अख्तर यांच्या विधानानंतर काही लोकांनी अख्तर यांच्या विरोधात आवाज उठवला आहे.

जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कितीतरी नेटकऱ्यांनी अख्तर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. सैफ अब्बास नकवी यांनी जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याला अतिशय खालच्या पातळीचं वक्तव्य म्हटलेलं आहे. तर काही लोकांनी अख्तर यांच्या या वक्तव्याला पाठिंबाही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT