Javed AKhtar Google
मनोरंजन

'खतम तो करना है|' कंगनाविरोधात जावेद अख्तरांचं मोठं वक्तव्य...

कंगनाविरोधातील मानहानीच्या केससंदर्भात ७ एप्रिल रोजी अंधेरी कोर्टात सुनावणी होणार होती. ती रद्द झाल्यानंतर जावेद अख्तर नाराज झालेले दिसून आले.

प्रणाली मोरे

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांना कंगना(Kangana Ranut) विरोधात सुरु असलेल्या अंधेरी सेशन कोर्टातील खटल्या संदर्भात निराश होऊन कोर्टातनं घरी परताव लागलं आहे. कंगनाविरोधात जावेद अख्तरांच्या सुरु असलेल्या केसवर ७ एप्रिल,२०२२ रोजी सुनावणी होणार होती. पण न्यायमूर्ती उपस्थित राहू न शकल्याने अचानक सुनावणी रद्द करण्यात आली. जावेद अख्तर यांच्या कंगनाविरोधातील मानहानीच्या केससंदर्भात आज ७ एप्रिल रोजी अंधेरी कोर्टात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल करीत नोव्हेंबर २०२० मध्ये कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा करीत तिनं एका टी.व्ही मुलाखतीत आपल्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचं म्हटलं होतं. तिच्या त्या वक्तव्यामुळे आपली सामाजिक प्रतिमा डागाळली जातेय असं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वीच कंगनाची केससंदर्भातील विनंती कोर्टानं फेटाळली होती.

जावेद अख्तर यांनी इंडिया टूडेशी बोलताना म्हटलं आहे की,''मी केससंदर्भातील प्रत्येक सुनावणीला स्वतः हजर राहण्याचा प्रयत्न करतो. जे सुरु केलंय ते संपवावं तर लागणारंच आहे''. या केसमधून लवकरात लवकर आपल्याला मोकळं करावं अशी विनंती कंगनानं अर्जाद्वारे कोर्टाला केली होती. तिनं त्यात म्हटलं होतं की,'' बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असल्याकारणानं आपल्याला शूटिंगसाठी देश-परदेशात सतत फिरतीवर रहावं लागतं. लोकांना दिलेला शब्द पाळावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर या केसमधून आपल्याला मोकळं करावं अशी विनंती कंगनानं केली होती''. पण यावर कोर्टानं तिचा अर्ज फेटाळत म्हटलं होतं की'', यात काहीच शंका नाही की सेलिब्रिटी असल्यामुळे तुम्हाला प्रोफेशनल कमीटमेंट पाळाव्या लागतात,पण तुम्ही हे विसरु नका की तुम्ही या केसमध्ये एक आरोपी देखील आहात''.

यावेळी कोर्टानं म्हटलं होतं की,''जर या केसमध्ये आरोपीला सूट दिली तर या केसमधील तक्रारदार जावेद अख्तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा कोर्टाप्रती,न्यायव्यवस्थेप्रती चुकीचा समज होईल,कोणतीही प्रगती केसमध्ये होणार नाही''. न्यायालयावं कंगनाच्या अर्जाला फेटाळत जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं होतं. त्यावेळी जावेद अख्तरांच्या वकिलांनी युक्तिवाद करीत म्हटलं होतं की कंगना केसकडे दुर्लक्ष करीत एकप्रकारे न्यायव्यवस्थेचा अवमान करीत आहे. कंगनाची ही केस तेव्हा सुरू झाली जेव्हा सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली अन् त्यासाठी कंगना सबंध बॉलीवूडला जबाबदार धरत मुलाखती देत सुटली होती. त्यावळी तिनं जावेद अख्तर यांचं नाव घेतलं होतं. त्यांना सुशांत केसमध्ये क्रिमिनलच एकप्रकारे तिनं म्हटलं होतं. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT