javed akhtar on rss comparison to taliban next hearing on april sakal
मनोरंजन

Javed Akhtar: 'RSS'ची तालिबानसोबत तुलना केल्या प्रकरणी जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावे लागणार, अन्यथा..

जावेद अख्तर यांच्यावर मुलुंड न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

नीलेश अडसूळ

Javed Akhtar : आरएएसची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. मध्यंतरी कोर्टानं जावेद अख्तर यांना दिलासा दिला होता. पण आता पुन्हा एकदा कोर्टाने जावेद अख्तर यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यांच्या लेखणीला आणि विधानांना सगळेच दबकून असतात असे बॉलीवुड मधील दिग्गज लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर सध्या बरेच चर्चेत आहेत. पण मग ते पाकिस्तानात जाऊन केलेलं भाष्य असो किंवा मोदींविषयीची विधानं.. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तालिबानशी तुलना केली होती. आता हे प्रकरण पुन्हा वर आलं आहे. (javed akhtar on rss comparison to taliban next hearing on april)

याप्रकरणी मुलुंड न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. काल 31 मार्च रोजी यावर सुनावणी होणार होती. पण जावेद अख्तर आज न्यायालयात येऊ न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

जावेद अख्तर आजारी असल्यामुळे न्यायालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे आता 20 एप्रिल 2023 रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 20 एप्रिलला जावेद अख्तर यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. जर 20 एप्रिललादेखील जावेद अख्तर न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केली जाण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते जावेद अख्तर..

'आरएसएस, बजरंग दल आणि तालिबान सारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही फरक नाही. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय संविधान एक अडथळा बनत आहे. परंतु जर संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील.'

'आरएसएस आणि तालिबान दोघांमध्ये फक्त नावाचा फरक आहे. दोघांची मानसिकता सारखीच आहे. तालिबानला इस्लामिक राज्य निर्माण करायचं आहे. तर दुसरीकडे यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. या लोकांना मुलगा आणि मुलगी एकत्र उद्यानात जाऊ नये असं वाटतं. दोघांमधील फरक इतकाच आहे की ते अद्याप तालिबानइतके शक्तिशाली नाहीत, पण तालिबानी लोकांच्या ध्येयासारखचं यांचंदेखील ध्येय आहे.'

'ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत.'

'तालिबान आणि त्यांच्या सारखं वागायची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याचं स्वागत केलं आहे. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टीच्या मागे लागले आहे. पण मुस्लिमांचा एक लहानसा गट असा आहे की जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT