javed akhtar
javed akhtar  Sakal
मनोरंजन

Javed Akhtar Birthday: बापरे! दिवसभरात दारूची बाटली संपवायचे जावेद अख्तर; नंतर झालं असं की...

सकाळ डिजिटल टीम

आज जावेद अख्तर यांचा वाढदिवस. एक वेळ अशी होती की त्यांना दारू पिण्याचे व्यसन जडले होते, पण त्यांनी वेळीच दारू सोडली. लेखक जावेद अख्तर यांनी सलीम खानसोबत अनेक उत्तमोत्तम चित्रपट लिहिले आहेत. 'शोले' आणि 'जंजीर' सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.

जावेद यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती की त्यांना दारू पिण्याचे व्यसन जडले होते, पण त्यांनी वेळीच दारू सोडली. खुद्द जावेद अख्तर यांनी ‘बॉलिवूड बबल’च्या एका चॅटशोमध्ये या दोन्ही लेखकांनी अगदी मोकळेपणाने संवाद साधला.

अरबाजने पहिल्या भागात सलीम खान आणि दुसऱ्या भागात जावेद अख्तर यांच्याशी संवाद साधला. दोघांनीही अरबाजच्या सगळ्या प्रश्नांची अगदी मस्त उत्तरं दिली. जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यांच्या एकत्र काम करण्याच्या पद्धतीवर स्पष्टपणे भाष्य केले आहे.

तसेच या मुलाखतीमध्ये जावेद यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दलही भाष्य केले आहे. जावेद अख्तर दारूच्या इतक्या आहारी गेले होते की ते व्यसन त्यांच्या जीवावर उठलं असतं या गोष्टीचा त्यांनी खुलासा केला आहे.

जावेद अख्तर म्हणाले, “मी केवळ मजा करायचो, एंजॉय म्हणून दारू घ्यायचो. दुःख विसरण्यासाठी मी कधीच ड्रिंक केलेलं नाही. मात्र एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझी मद्यपानाची सवय अशीच राहिली तर मी फारफार तर वयाच्या ५२ किंवा ५३ वर्षापर्यंत जगेन.

मी ३१ जुलै १९९१ या दिवशी एक संपूर्ण रमची बाटली रिचवली. मी त्याच्या पुढच्या दिवसापासून दारूला स्पर्शही केलेला नाही, किंवा साधा शॅंपेनचा एक घोटही घेतलेला नाही.”

दारू सोडण्याच्या बाबतीत अरबाज खान जावेद अख्तर यांच्या इच्छाशक्तीचे कौतुक करतो. यावर जावेद म्हणतात, 'इच्छाशक्ती ही गोष्ट नाही. इच्छेचा विषय आहे. जगणे हे माझे सर्वात मोठे व्यसन आहे आणि यापेक्षा मजबूत व्यसन दुसरे नाही.

यापूर्वी 2012 मध्ये जावेद अख्तर यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते शोमध्ये मद्यपानाच्या व्यसनाबद्दल खुलासा केला होता. त्यांनी शोमध्ये सांगितले की, 'मी वयाच्या 19 व्या वर्षी दारू पिण्यास सुरुवात केली.

ग्रॅज्युएशन पूर्ण करून मी बॉम्बेला आलो तेव्हा मित्रांसोबत दारू प्यायला लागलो आणि नंतर सवय झाली. पूर्वी माझ्याकडे पैसे कमी असायचे, पण यशानंतर पैसे येऊ लागले. मग एक वेळ आली जेव्हा मी दिवसातून एक बाटली प्यायचो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT