javed akhtar 
मनोरंजन

'अमेरिका कसली सुपरपॉवर?'; जावेद अख्तर यांचा संताप

तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता काबीज केल्यानंतर तिथल्या नागरिकांची देशातून जीवघेणी पळापळ सुरू झाली.

स्वाती वेमूल

तालिबानने Taliban अफगाणिस्तानातील Afghanistan सत्ता काबीज केल्यानंतर तिथल्या अनेकांची देशातून जीवघेणी पळापळ सुरू झाली. लोकांचे लोंढे काबूल Kabul विमानतळावर दाखल झाले. सोमवारी काबूलमध्ये अक्षरश: अनागोंदी माजलेली पहायला मिळाली. तालिबान्यांच्या दहशतीने भयभीत शेकडो नागरिक मुलाबाळांसह देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर जमले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत नागरिक धावपट्टीवरून धावताना दिसत आहेत. तर आणखी एका व्हिडीओत अमेरिकी सैनिक धावपट्टीवरील गर्दीला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करीत असल्याचे दिसत आहे. या संपूर्ण प्रकारावर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी याविषयी ट्विट केलं. ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर Javed Akhtar यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला.

जावेद अख्तर यांचं ट्विट-

'तालिबान नावाच्या या रानटी लोकांचा नायनाट करू न शकणारी अमेरिका ही कसली महाशक्ती आहे? अफगाण स्त्रियांवर जराही दया न दाखवता त्या धर्मांधाच्या अधीन सोडणारे हे जग खरंच कसले जग आहे? मानवाधिकारांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या सर्व पाश्चिमात्य देशांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे', अशा शब्दांत अख्तर यांनी संताप व्यक्त केला.

गेली २० वर्षे अमेरिका आणि मित्रदेशांनी अफगाणिस्तानला सावरण्यासाठी आणि तिथली परिस्थिती बदलण्यासाठी मदत केली. अमेरिका, ब्रिटन आणि नाटोचे सैन्य तेथे ठाण मांडून होते. अमेरिकेने तिथून सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर तालिबान्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आणि संपूर्ण सैन्यमाघारीला दोन आठवडे उरले असताना काबूल ताब्यात घेतलं. तालिबानी सैन्याने एका आठवड्यात देशावर ताबा मिळवला. सरकारी फौजांनी त्यांच्यापुढे शरणागती पत्करली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

Latest Marathi News Live Update : जळगाव सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT