Jawan Actress Nayanthara Instagram debut fans  esakal
मनोरंजन

Jawan Nayanthara: 'जवान'च्या ट्रेलर सोबतच नयनतारानं केला मोठा धमाका! ती पहिल्यांदाच...

यात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जवान हा ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Jawan Actress Nayanthara makes her Instagram debut ahead : साऊथची सुपरस्टार नयनतारा ही सध्या किंग खानच्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. त्यात ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये नयनतारानं एका महिला पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. पठाणनंतर जवान हा शाहरुखचा एक महत्वकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जाते.

आज जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अवघ्या काही तासांत तीस लाखांहून अधिक व्ह्यूज या ट्रेलरला मिळाले आहे. यात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जवान हा ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. त्यात विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिका आहे.

also read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

त्यात नयनताराच्या भूमिकेविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ती पहिल्यांदाच शाहरुखसोबत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड असा संघर्ष दिसून येत असून त्यात टॉलीवूडची सरशी झाली आहे. मात्र या वर्षांच्या सुरुवातीला शाहरुखचा जवान रिलिज झाला आणि त्यानं टॉलीवूडला जोरदार टक्कर दिल्याचे दिसून आले आहे.

पठाणनं तर देशभरातून एक हजार कोटींची विक्रमी कमाई केली होती. त्यामुळे आता जवानकडून देखील नेटकरी मोठी अपेक्षा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात शाहरुखसोबत दीपिका, आलिया आणि नयनतारा ट्रेडिंगचा विषय आहे. यासगळ्यात नयनतारा पहिल्यांदाच इंस्टावर अॅक्टिव्ह झाल्यानं ती चर्चेचा टॉपिक आहे. तिनं इंस्टावर आपलं अकाउंट सुरु केले आहे.

नयनतारानं जे फोटो पोस्ट केले आहे त्यात तिच्या जुळ्या मुलांचे फोटो आहेत. त्याला लाखो व्हयुज मिळाले आहेत. याशिवाय जवानचा ट्रेलरही तिनं शेयर केला असून त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून येत आहे. त्याची चर्चाही होत आहे. एकीकडे साऊथमधील अनेक सेलिब्रेटी इंस्टावर अॅक्टिव्ह असताना नयनतारानं इंस्टावर केलेलं डेब्यू चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT