Jawan Advance Booking esakal
मनोरंजन

Jawan Advance Booking : 'गदर २' वाले तुमचं चंबूगबाळ आवरा, शाहरुखचा 'जवान' येतोय! रिलीजपूर्वीच केला मोठा धमाका

पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात शाहरुखचा जवान प्रदर्शित होतो आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Jawan Movie Ticket Booking - गदर २ मधील सनीच्या परफॉर्मन्सनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यत या चित्रपटानं चारशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून जगभरामध्ये गदर २ ने वेगवेगळे विक्रम केले आहेत. मात्र या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी किंग खान शाहरुखचा जवान येतो आहे.

पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात शाहरुखचा जवान प्रदर्शित होतो आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवानचे अॅडव्हान्स बुकींग देखील जोरात सुरु झाले आहे. सुरुवातीला सनीच्या गदर २ च्या अॅडव्हान्स बुकींगनं लक्ष वेधून घेतले होते. त्यात आता जवान प्रदर्शित होणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढल्याचे दिसून आले आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

यापूर्वी शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानं हजार कोटींची कमाई करुन बॉलीवूडमध्ये एक मोठा विक्रम केला होता. त्यानंतर आता त्याचा जवान प्रेक्षकांसाठी आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे. जवानचा या अगोदर ट्रेलर व्हायरल झाला होता. त्याला लाखो चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. तसेच त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. त्यामुळे पठाण प्रमाणेच जवानही सुपरहिट होणार असे म्हटले जात आहे.

जवानमध्ये शाहरुख खान, विजय सेतूपति, नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियदर्शिनी यांच्या भूमिका आहेत. जवानच्याबाबत आणखी एक मोठी गोष्ट सांगायची झाल्यास जगभरातील सर्वोत्तम सहा अॅक्शन मास्टर दिग्दर्शकांनी शाहरुखसाठी काम केले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मोठी ट्रीट असणार आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे जोरदार प्रमोशन सुरु झाले असून अॅडव्हान्स बूकींगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये किंग खानच्या जवानचे अॅडव्हान्स बूकींग सुरु झाले आहे.हा चित्रपट पाच भाषांमध्ये सात सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट ५० कोटींची अॅडव्हान्स बूकींग पूर्ण करणार असल्याचे बोलले जात आहे. पठाणला पहिल्याच दिवशी ३७ कोटींची ओपनिंग मिळाली होती.

सॅकनिकच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेमध्ये जवानचे आतापर्यत दहा हजारांपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली आहेत. हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या एका बातमीनुसार, विदेशात जवाननं ६० लाखांपर्यतंची कमाई हा चित्रपट पहिल्याच दिवशी करण्याची शक्यता आहे. मिडल ईस्टमध्ये ९३० तिकीट बूक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पुण्यात नदीपात्रातील चौपाटीमध्ये एकाला जबर मारहाण

SCROLL FOR NEXT