Jawan Box Office Collection Day 10: Esakal
मनोरंजन

Jawan BOCollection: शाहरुखचा 'जवान' प्रभासच्या 'बाहुबली'चा रेकॉर्ड मोडणार का? अवघ्या दहा दिवसात केली इतक्या कोटींची कमाई!

Vaishali Patil

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या 'जवान' या चित्रपटाची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. चित्रपटाची कमाई, अॅक्शन सीन, गाणी आणि कलाकारांची जबरदस्त स्टाइलने सर्वांनचीच मनं जिंकली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक चित्रपटावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. चित्रपटाने रिलिज होताच अनेक रेकॉर्ड मोडले आहे.

चित्रपटाने 9व्या दिवशी केवळ 19.1 कोटींची कमाई केली होती. रिलिजच्या दुसऱ्या शनिवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 31.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने 10 दिवसांत एकूण 440.48 कोटींची कमाई केली आहे. जवान चित्रपटाने केवळ 10 दिवसांत 440.48 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात जवानने आत्तापर्यंत 700 कोटींची कमाई केली आहे.

'जवान'चे प्रोडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंटने याबाबत आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत ही माहीती चाहत्यांना दिली आहे. 'जवान'ने जगभरात 700 कोटींचा आकडा पार केला आहे. प्रोडक्शन हाऊसच्या सांगितल्याप्रमाणे चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 9 दिवसांत जगभरात 735.02 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'जवान'मध्ये शाहरुख खान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. त्याच्यासबोतच चित्रपटात नयनतारा, रिद्धी डोगरा, प्रियामणी आणि सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर विजय सेतूपती हा खलनायकाच्या भुमिकेत आहे. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांचादेखील चित्रपटात एक खास कॅमिओ आहे.

शाहरुख खानने 'जवान' चित्रपटासोबतच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'जवान'ने रिलीजच्या 10व्या दिवशी 31.50 कोटींची कमाई करत 'पठाण' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पठाणने रिलिजच्या 10व्या दिवशी केवळ 14 कोटींची कमाई केली होती.

मात्र जवान सनी देओलच्या 'गदर 2'ला मागे टाकू शकला नाही. त्याने रिलीजच्या 10व्या दिवशी 38.9 कोटींची कमाई कली होती. तर दुसरीकडे'बाहुबली'ने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता शाहरुखचा जवान 'बाहुबली'चा रेकॉर्ड मोडू शकेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'जवान'च्या यशानंतर शाहरुख खानने आता त्याच्या पुढच्या 'डंकी' या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. किंग खानसोबत तापसी पन्नू दिसणार असून हा सिनेमा यावर्षी ख्रिसमसला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT