jawan chaleya song release shah rukh khan nayanthara SAKAL
मनोरंजन

Jawan Chaleya Song Release: जवान सिनेमाचं पहिलं रोमँटीक गाणं रिलीज, शाहरुख - नयनताराची लाजवाब केमिस्ट्री

शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज चार वर्षांनंतर पाहायला मिळत आहे.

Devendra Jadhav

Chaleya Song Release News: शाहरुख खानच्या जवान सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. जवानच्या टीझरपासुनच सिनेमाची प्रचंड हवा आहे.

काही दिवसांपुर्वी 'जवान'चं 'जिंदा बाद' गाणं रिलीज झाला आणि चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढला. जिंदा बंदा नंतर किंग खानचा रोमँटिक ट्रॅक आज रिलीज करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे 'चलेया' या नव्या गाण्यात शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज चार वर्षांनंतर पाहायला मिळत आहे.

'जवान' मधील 'चलेया' हा रोमँटिक ट्रॅक रिलीज

शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर 'चलेया' गाणं आज रिलीज झाले आहे. नयनतारा आणि शाहरुख पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र रोमान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात, शाहरुख खान रंगीबेरंगी पोशाखात त्याच्या आयकॉनिक पोझसह रोमान्सची जादू खेळत आहे. त्याचबरोबर नयनताराची सुंदर शैलीही पाहायला मिळत आहे.

हे गाणे पाहता शाहरुख आणि नयनताराची रोमँटिक जोडी पडद्यावर गाजणार असं दिसतंय. शाहरुख खानने या गाण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "इश्क हो बेहिसाब सा, बेपरवाह, बेहद सा, कुछ ऐसा है जवान का प्यार."

चलेया गाण्याचं वैशिष्ट्य

चलेया गाण्याचं वैशिष्ट्य असं की, मुंबईच्या लोकेशनवर गाणं शूट झालंय. वरळी कोळीवाडा, बांद्रा वरळी सी लिंक, बँड स्टँड अशा खास लोकेशनवर शाहरुख नयनताराच्या रोमान्सची जादू दिसतेय.

शाहरुख खानचं वय ५५ झालं असलं तरीही त्याच्या रोमान्सला वयाचं बंधन आलेलं दिसत नाही.

जवानची रिलीज डेट

शाहरुखचा जवान हा चित्रपट हा रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन आहे. ज्याचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले असून गौरी खाननं निर्मात्या तर गौरव वर्मा सह-निर्मात्याच्या भूमिकेत आहे.

हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT