Jawan First Day Collection Shah Rukh Khan Movie 100 Core esakal
मनोरंजन

Jawan Prediction: पहिल्याच दिवशी 'जवान' करणार 100 कोटींची कमाई? ट्रेंड अ‍ॅनालिस्टनं सांगितलं 'पठाण' चं रेकॉर्ड मोडणार

जवान हा पहिल्याच दिवशी शंभर कोटींची कमाई करणार असे बोलले जात आहे. तशा काही बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

युगंधर ताजणे

Jawan First Day Collection Shah Rukh Khan Movie 100 Core : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा जवान नावाचा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी शाहरुखचा यावर्षी पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. आता तर बॉलीवूडच्या ट्रेंड अॅनालिस्टनं मोठा खुलासा केला आहे.

जवान रिलिज होण्यापूर्वी त्याला बाहेर देशातील अॅडव्हान्स बूकींगला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुख खानचे चाहते जगभर पसरले आहेत. त्याच्या नावाची क्रेझही मोठी आहे. गेल्या चित्रपटाप्रमाणे याही चित्रपटावरुन वादाला सुरुवात झाली आहे. त्या चित्रपटाचे निर्माते कोण यावरुन आता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यात जवानचे नाव घ्यावे लागेल.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

जवान हा पहिल्याच दिवशी शंभर कोटींची कमाई करणार असे बोलले जात आहे. तशा काही बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवान हा ट्रेंड होत आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे शाहरुख खान आहे. असे बोलले जात आहे. शाहरुखचा जगभर पसरलेला चाहतावर्ग, त्या चित्रपटातील कलावंत, त्यांचे चाहते, यामुळे जवानही मोठी कमाई कऱणार असे बोलले जाऊ लागले आहे.

जवानच्या ग्लोबल ओपनिंगविषयी बोलायचे झाल्यास तो प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुखचा आतापर्यत सर्वाधिक दमदार इंट्री करणारा चित्रपट म्हणून जवानकडे पाहिले जात आहे अशी चर्चा आहे. सात सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्यात दीपिका, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपति यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बिझनेस अॅनालिस्च गिरीश जोहर यांनी हिंदूस्थान टाईम्सशी बातचीत करताना असे म्हटले आहे की, जवानला ओपनिंगच शंभर कोटींची मिळेल यात शंका नाही. डॉमेस्टिक मार्केटमध्ये हा चित्रपट पठाणचे रेकॉर्ड देखील ब्रेक करेल असे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी कमाई करणारा जवान हा पहिलाच चित्रपट असेल असेही बोलले जात आहे.

त्याचे दुसरे कारण हा चित्रपट पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे. तो सगळ्या भाषांमधून ६० कोटींची कमाई करेल. ओव्हरसीज मार्केट मधून या चित्रपटाला ४० कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे. असेही जोहर यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT