jawan first review shah rukh khan nayanthara atlee vijay sethupati  SAKAL
मनोरंजन

Jawan Review: एंटरटेनमेंटचं धमाकेदार पॅकेज, कसा आहे शाहरुखचा जवान? पहिला रिव्ह्यू आला समोर

शाहरुखच्या जवानचा पहिला रिव्ह्यू समोर आलाय

Devendra Jadhav

Jawan News: शाहरुखचा जवान सिनेमा अवघ्या तीन दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशात नाही तर जगभरात जवान सिनेमाची चर्चा आहे. जवान सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे.

जवान सिनेमा पाहण्यासाठी भारतातले नव्हे तर जगभरातले फॅन्स वाट बघत आहेत. जवान कसा आहे हे पाहण्यासाठी सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर आलाय. पाहा कसा आहे शाहरुखचा जवान पाहा.

(jawan first review)

शाहरुखच्या जवानचा पहिला रिव्ह्यू आला समोर

जवानच्या रिलीजच्या दोन दिवस आधी, शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू ट्विटरवर आला आहे. 'ऑलवेज बॉलिवूड' या मनोरंजन वेबपोर्टलने 'जवान'चे रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केले आहेत.

चित्रपटाच्या पोस्टरसोबत शेअर केलेल्या या रिव्ह्यूमध्ये असे म्हटले आहे की, "जवान हा एक अतिशय मनोरंजक गुन्हेगारीवर आधारीत असलेला चित्रपट आहे. ज्यामध्ये गुंतागुंतीचं कथानक आणि वेगवान कथानक आणि चमकदार छायांकन आहे. अॅक्शन, कॉमेडी, थ्रिल आणि बरेच काही असलेले भरलेले मनोरंजन पॅकेज. सिनेमात शाहरुख खान, विजय सेथुपती आणि अॅटली तुम्हाला तुमच्या खुर्चीवर बांधून ठेवतात."

साऊथ इंडियन पेहरावात शाहरुखने वेधलं सर्वांचं लक्ष

जवान रिलीज होण्याआधी शाहरुख अनेक मंदिरांना भेट देऊन मनोभावे प्रार्थना करताना दिसतोय. यापूर्वी किंग खान माता वैष्णोदेवीच्या दरबारात जम्मूला पोहोचला होता. आणि आता तो आंध्र प्रदेशातील तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी गेलाय.

तिरुपती मधील श्री व्यंकटेश्वर मंदिरात शाहरुखने जाऊन आशीर्वाद घेतले. त्याच्यासोबत मुलगी सुहाना आणि 'जवान' अभिनेत्री नयनताराही होती. ANI ने शाहरुखचा व्हिडीओ शेअर केलाय. शाहरुख साऊथ इंडियन पेहरावात दिसत तो स्मितहास्याने फॅन्सवर प्रेम दर्शवताना दिसतोय.

जवानमधल्या त्या डायलॉगवरुन करणी सेनेने घेतला आक्षेप

दरम्यान शाहरुखचा जवान वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. करणी सेनेने शाहरुखच्या जवानमधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे शाहरुख अडचणीत सापडला आहे.

"एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भुखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था", या संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्या डायलॉगवरुन करणी सेनेनं आक्षेप घेतला आहे. त्यांनी त्याविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. शाहरुखचा जवान ७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT