Jawan Leaked Online In HD Quality: SAKAL
मनोरंजन

Jawan Leaked Online: शाहरुखच्या जवानला मोठा झटका! पहिला शो होताच एचडी प्रिंटमध्ये 'या' साइट्सवर चित्रपट लीक!

Vaishali Patil

Jawan Leaked Online In HD Quality: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर 'जवान' या चित्रपटसाची क्रेझ चाहत्यांमध्ये होती. अखेर तो दिवस उजाडला आणि शाहरुख खानचा जवान आज थिएटरमध्ये रिलिज झाला. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर रिलिज होताच चाहत्यांमध्ये उत्साह दिसत होता.

चित्रपट रिलिज झाल्यानंतर चाहत्यांनी सकाळपासून थिएटरमध्ये एकच गर्दी केली आहे. चित्रपटाची ट्विटरसह इतर सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. मात्र चित्रपट रिलिज होताच आता शाहरुख खान आणि निर्मात्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

शाहरुखचा जवान रिलिज होऊन पहिला शो रिलिज होताच चित्रपट लीक झाला आहे. तो देखील एचडी प्रिंटमध्ये. त्यामुळे आता याचा चित्रपटाच्या कमाईला मोठा धक्का बसू शकतो असं बोललं जात आहे.

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जितकी क्रेझ आहे. तितकाच सोशल मीडियावर पायरसी करणाऱ्या हॅकर लोकांचीही नजर होती. याच कारणामुळे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच ऑनलाईन लीक झाला.

इकडे 'जवान'चा पहिला शो संपला अन् तिकडे सोशल मीडियावर हा चित्रप लीक झाला. त्यामुळे याचा आता निर्मात्यांना मोठा फटका बसणार आहे. कारण पायरसीचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होतो.

साइटच्या बाबतीत बोलायचं झालं तर शाहरुखचा जवान बऱ्याच साईटवर लीक झाला आहे. त्यात तमिलरॉकर्स, Mp4movies, Pagalworld, Vegamovie, Torrent आणि Filmyzilla सारख्या अनेक पायरसी साइट्सचा सामावेश आहे. नेटकऱ्यांना हा चित्रपट तिथे HD मध्ये उपलब्ध आहे. हे काही पहिल्यांदाच झालेले नाही असे अनेक चित्रपट लीक झाले आहेत

शाहरुख खानच्या या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक अॅडवान्स बुकिंग केली होती. या चित्रपटाने प्रीसेलमध्ये 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर पहिल्याच दिवशी शाहरुखचा जवान चित्रपट बंपर कलेक्शन करु शकतो अशी आशा आहे. त्यातच आता चित्रपट लीक झाल्याने त्याचा फटकाही चित्रपटाच्या कमाईला बसेल.

जवान चे दिग्दर्शन अॅटली यांनी केले आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर या चित्रपटात दीपिका पदुकोणचा देखील खास कॅमिओ आहे. या चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ आणि ‘चलेया’ सारखी गाणी आधीच चार्टबस्टर ठरली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT