Jawan Movie Record Break Box Office collection  esakal
मनोरंजन

Jawan Movie Record Break : 'जवान'नं भारतीय चित्रपट विश्वात घडवला इतिहास! ठरला पहिला हिंदी चित्रपट ज्यानं....

किंग खानच्या या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. अखेर तो प्रदर्शित झाला आणि त्यानं वेगळा इतिहास घडवल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Jawan Movie Record Break Box Office collection : शाहरुखच्या जवाननं प्रदर्शित झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. किंग खानच्या या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. अखेर तो प्रदर्शित झाला आणि त्यानं वेगळा इतिहास घडवल्याचे दिसून आले आहे.

शाहरुखचा जवान आणि गदर या दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या स्पर्धा दिसून येत आहे. त्यात गदर २ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली आणि जवाननं केलेल्या कमाईची तुलना करण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी देखील त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यासगळ्यात जवाननं बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव

अॅटली दिग्दर्शित जवाननं एका दिवसांत भारतातून ७५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातून १२९ कोटींची कमाई करुन भारतात नवा विक्रम केला आहे. जवान हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे ज्यानं एकाच दिवसांत पूर्ण जगभरातून १२९ कोटींची कमाई केली आहे. सोशल मीडियावर सध्या किंग खानचा जवान हा ट्रेडिंगचा विषय आहे.

एक्स वर तर शाहरुखचा जवान हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. दुसरीकडे बॉलीवूड, टॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील शाहरुखचे कौतुक केले आहे. त्यात साऊथचे एस एस राजामौलींनी देखील किंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत. आपण शाहरुखला बॉक्स ऑफिसचा बादशाह का म्हणतो याचे कारणही राजामौलींनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सध्या सगळीकडे शाहरुखचा जवान चर्चेचा विषय आहे. गुगलनं देखील किंग खानचं कौतुक केलं आहे. त्यांनी गुगलच्या होमपेजवर जवानची थीम ठेवत त्याला शाहरुखचा आवाज दिला आहे. त्याचे स्क्रीन शॉट देखील वेगानं व्हायरल होत आहे. गुगलनं देखील एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अशाप्रकारे येत्या दिवसांत जवान हा वेगळा विक्रम करणार अशी चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT