Deepika Padukone Character Esakal
मनोरंजन

Jawan: जवानमध्ये दीपिका बनणार शाहरुखची आई! प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लावले शोध..

Vaishali Patil

Deepika Padukone Character: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहत आहेत. सोमवारी 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज करण्यात आला.

तो येताच सोशल मिडिया वरील वातावरण शाहरुखमय झालं. ट्विटरवर फक्त शाहरुख आणि जवानचीच चर्चा रंगली होती.

चाहत्यांना जवानचा प्रीव्ह्यू कसा वाटला हे सांगणारे अनेक ट्विट सोशल मिडियावर फिरु लागले.

काहींना जवानचा प्रीव्ह्यू खुपच आवडला तर काहींनी यात खुप चुका काढल्या. त्यात काहींनी जवानचे सीन कॉपी केलं असल्याचे सांगितले.

तसचं या प्रीव्ह्यूनंतर चित्रपटाची कथा काय असेल याचा शोध आता ट्विटर यूजर्स लावू लागले आहेत.

यासोबतच दीपिका पदुकोणची भुमिका कोणती असेल याचाही अंदाज अनेकजणांनी व्यक्त केला. , अनेक चाहत्यांनी चित्रपटाची कथा देखील डीकोड करण्यास सुरुवात केली आहे.

ट्रेलर मध्ये दिपिकाही जबरदस्त फायटिंग सीन करातांना दिसली. ती साडीत अॅक्शन सीन करतांना दिसली.

दीपिका पदुकोण या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत स्पेशल अपिअरन्स करताना दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये ती लाल रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे. मुसळधार पावसात ती रिंगणात कोणाला तरी मारताना दिसत आहे.

दीपिका पदुकोणच्या व्यक्तिरेखेबद्दल चर्चाही सुरू झाली आहे.

त्यात आता दिपिका शाहरुखच्या आईच्या भुमिकेत असेल असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. यासोबतच नेटकऱ्यांनी चित्रपटाची स्टोरी देखील लाईनही तयार केली

दीपिका पदुकोण शाहरुख खानच्या आईच्या भूमिकेत दिसणार असा दावा आता चाहत्यांनी केला आहे.

एका चाहत्याने लिहिले, 'जवानच्या कथेबद्दल मी जे विचार करत आहे ते मी शेअर करतो. दीपिका ही शाहरुखची आई आहे.

जिच्यावर विजयने खोटे आरोप लावले आहेत, त्यामुळे ती तुरुंगात जाते तिथेती शाहरुखला जेलमध्ये जन्म देते आणि मरते.

शाहरुख तुरुंगात महिलांसोबत वाढतो आणि खूप गोंडस आहे. त्याच दरम्यान त्याला त्याच्या आईबद्दल सत्य कळते आणि त्यानंतर तो खतरनाक व्हिलन बनतो आणि आईचा बदला घेतो.

तर दुसऱ्या युजरने दीपिकाचे फोटो शेअर करत लिहिले, 'तर दीपिका तुरुंगात शाहरुख खानला जन्म देणार आहे.

तर आणखी एका व्यक्तीने लिहिले की, 'दीपिका शाहरुख खानची आई होऊ शकते, कारण तिचा एक कॅमिओ आहे आणि नयनतारा मुख्य भूमिकेत असेल'

त्यात एकाने लिहिले, 'मला वाटले की ती तुरुंगात मरते, बाळा पकडलेला दीपिका पदुकोणचा आहे असं दिसत.

असं असली तरी निर्मात्यांनी अद्याप दीपिकाच्या व्यक्तिरेखेवर काहीही सांगितले नाही. दिपिकानेही याबद्दल काहीच सांगितलेले नाही.

जवानाचे दिग्दर्शन अटली कुमारच्या चित्रपटात सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती आणि प्रियामणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT