Nayanthara First Look:  Esakal
मनोरंजन

Nayanthara First Look: वादळापुर्वी येणारी 'शांती'! 'जवान'मध्ये नयनताराचा डॅशिंग लूक रिव्हिल

शाहरुखने 'जवान'चं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये नयनतारा बॉस लेडी लूकमध्ये दिसत आहे.

Vaishali Patil

Jawan Nayanthara Look:  शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटलं जात आणि किंग खान त्याला असं का म्हटलं जातं हे वेळोवेळी सिद्ध करत असतो. सध्या शाहरुख त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच जवानचा प्रिव्ह्यू रिलिज करण्यात आला, ज्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्या व्हिडिओ सार्वधिक व्ह्यूज देखील मिळाले.

या चित्रपट शाहरुख अनेक वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला. मात्र आता चित्रपटाची मुख्य अभिनेत्री साउथस्टार नयनताराचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. 'जवान' मधील नयनताराचं पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे, ज्यामध्ये ती जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसत आहे. नयनताराची छोटीशी झलक प्रिव्ह्यूमध्‍ये दिसली होती. त्यानंतर तिचे चाहते तिचा लूक पाहण्यासाठी उत्सुक होते.

आता तिचा लूक समोर आल्याने चाहत्यांना आता चित्रपटाच्या रिलिजची उत्सुकता लागली आहे. नयनतारा सोशल मिडियावर नाही त्यामुळे तिचे पोस्टर शाहरुख खानने स्वत: शेयर केले आहे. या पोस्टरच्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. नयताराचा पोस्टर शेयर करत किंग खानने लिहिले आहे, 'वादळ येण्यापूर्वीची शांतता.'

नयनतारा या पोस्टरमध्ये ब्लॅक बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये दिसत आहे आणि याशिवाय तिने सनग्लासेसही लावला आहे. शाहरुख खानने शेअर केलेल्या नयनताराच्या या लूकवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. नयताराला आधीच साउथमध्ये बॉस लेडी म्हटलं जात आणि आता ती बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाने सर्व रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

नयनताराच्या पोस्टरवरुन ती या चित्रपटात किती अॅक्शन करणार याचा अंदाज लावला जावु शकतो. नयनतारा या चित्रपटात पोलिसाची भुमिका साकारत आहे.

चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान आणि नयनतारासोबतच यात सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती आणि प्रियामणी यांचा समावेश आहे. दीपिका पदुकोण देखील चित्रपटात स्पेशल अपिअरन्समध्ये आहे.

शाहरुख खानच्या 'जवान' हा रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रस्तुत आहे. ज्याचे दिग्दर्शिन अॅटलीने केले आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रिलिज होईल. जो हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

SCROLL FOR NEXT