jawan ott release date on netflix shah rukh khan nayanthara vijay sethupati  SAKAL
मनोरंजन

Jawan on OTT: हजार कोटींचा टप्पा पार केल्यानंतर किंग खानचा 'जवान' ओटीटीवर धडकणार! जाणून घ्या केव्हा आणि कुठे पहायचा

Vaishali Patil

Jawan OTT release: बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हे वर्ष शाहरुख खानसाठी खुप खास ठरलं आहे. या वर्षी त्याचा 'पठाण' आणि 'जवान' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हजार कोटींच्यावर कमाई केली आहे.

आता शाहरुख खानचा जवान हा चित्रपट हजार करोडच्यावर कमाई करणारा पहिला हिंदी सिनेमा ठरला आहे. तर याच वर्षी शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलिज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आत्तापासूनच प्रतिक्षा करत आहेत.

तर जवान सिनेमा रिलिजच्या एक महिन्यानतंरही चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे. आता त्याच्यातच शाहरुख खान चा जवान हा ओटीटीवर रिलिज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवान हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज होण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे. नेटफ्लिक्सने जवान चित्रपटाचे ओटीटी हक्क तब्बल 250 कोटी रुपयांना विकत घेतले असल्याचे बोललं जात आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे 45 ते 60 दिवसांच्या आत तो OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्यामुळे आता शाहरुखचा जवान हा सिनेमा ऑक्टोबरच्या अखेरीस म्हणजे विशेषत: 28 किंवा 29 तारखेच्या आसपास नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे.

तर दुसरीकडे पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, जवान चित्रपट शाहरुखच्या वाढदिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी Netflix वर रिलिज होईल. यावर्षी शाहरुखचा 58 वा वाढदिवस आहे. तर 11 ऑक्टोबर 2023 रोजी याची घोषणा केली जाईल. मात्र याबाबात अधिकृत माहीती समोर आलेली नाही.

त्यामुळे आता जर तुम्ही जवान सिनेमा आत्तपर्यंत पाहिला नसेल तर हा सिनेमा तुम्ही घरबसल्या पाहू शकतात.

जवानाने शाहरुखच्या पठाण चित्रपटालाही मागे टाकला आहे. जवानाने आतापर्यंत जगभरात 1100 कोटींची कमाई केली आहे. तर यात चित्रपटाने भारतात 618 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये शाहरुख खानशिवाय प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर आता प्रेक्षकांना जवान च्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

Nagpur News: माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; मातृतीर्थावर लाखो जिजाऊ भक्तांची उपस्थिती; जिजाऊसृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहण!

SWAYAM Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SWAYAM जानेवारी 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षा कधी होणार

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

SCROLL FOR NEXT