jawan released Shahrukh khan fans dancing in theatre on jawan jinda banda song video viral  SAKAL
मनोरंजन

Jawan Release: थिएटरमध्ये स्टेडियमचा माहोल, शाहरुखच्या जिंदा बंदा गाण्यावर पब्लिकचा जल्लोष, डान्स करुन सर्वांचं सेलिब्रेशन

प्रेक्षकांनी शाहरुखच्या जवान पाहत असतानाच थिएटरमध्ये कल्ला केलाय

Devendra Jadhav

Jawan News: शाहरुखचा जवान सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय. जवान सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आज पहाटेपासुन थिएटरबाहेर गर्दी करत आहेत. जवान सिनेमाची क्रेझ इतकी आहे की थिएटरला स्टेडियमचं रुप आलंय.

जवान सिनेमा पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल्ल झालंय. अशातच एका थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. यात थिएटरमधील पब्लिक डान्स करुन जवानचं हटके सेलिब्रेशन करत आहेत.

(jawan released Shahrukh khan fans dancing in theatre)

शाहरुखच्या जवानवर उधळल्या पताका

शाहरुख खानचा जवान संपूर्ण भारतात आज रिलीज झालाय. जवानची किती क्रेझ आहे हे पाहायला मिळतंय.

शाहरुखच्या जवानचं जिंदा बंदा गाणं मोठ्या पडद्यावर आल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. थिएटरला पूर्ण स्टेडियमचं रुप आलेलं दिसलं. याशिवाय उपस्थित प्रेक्षकांनी पताकांची उधळण केली. याशिवाय मोबाईल टॉर्च लावून डान्स केला. एकुणच जवानमुळे संपूर्ण थिएटरमध्ये सण असल्यासारखं पब्लिक जल्लोष करत आहे.

माहिमच्या गैटी गॅलेक्सी मध्ये जवानचं अनोखं सेलिब्रेशन

माहिमच्या गैटी गॅलेक्सी सिनेमागृहात दर्दी मुंबईकर प्रत्येक सिनेमाचं दणक्यात स्वागत असतात. या थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. शाहरुखचा आज रिलीज झालेल्या जवाननिमित्ताने सुद्धा असंच काहीसं वातावरण दिसतंय.

आज दहीहंडी असल्याने एका गोविंदा पथकाने माहिमच्या गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर हजेरी लावली होती. थिएटरबाहेर भल्या पहाटे या गोविंदा पथकाने ५ थर लावून जवानला अनोखी सलामी दिलीय. यावेळी उपस्थित पब्लिकने हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केलाय

शाहरुखने स्वतःच्याच सिनेमाचा रेकॉर्ड मोडला

जवान चित्रपटाच्या प्री-रिलीज तिकीट विक्रीवर इंडस्ट्रीतील तज्ञ व्यक्ती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जवानची तिकीट विक्रीची संख्या अत्यंत आश्चर्यकारक आहे. संपूर्ण भारतातील उत्सुक चित्रपटप्रेमींनी पहिल्याच दिवशी तब्बल पाच लाखांहून जास्त तिकिटे काढली आहेत.

झूम डॉट कॉमनुसार जवानच्या हिंदी आवृत्तीसाठी 529,568, तमिळ आवृत्तीसाठी 19,899 आणि तेलुगू आवृत्तीसाठी बघण्यासाठी 16,230 मध्ये विभागली गेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, जवानने IMAX फॉरमॅटमध्ये 11,558 तिकीट विक्री करून लक्षणीय लक्ष वेधले आहे. इतकी जबरदस्त तिकीट विक्री बघता जवानने पठाणचा रेकॉर्ड मोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT