Shah Rukh Khan's Jawan screened at Handwara cinema hall in Jammu & Kashmir SAKAL
मनोरंजन

Jawan in Kashmir: अतिरेकी भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जम्मूमधील हंदवारा हॉलमध्ये होणार स्पेशल स्क्रिनींग

जवान जम्मू - काश्मिरमध्ये दाखवला जाणार आहे, वाचा सविस्तर

Devendra Jadhav

शाहरुख खानचा जवान बॉक्स ऑफीसवर तुफान कामगिरी करतोय. जवान पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. जवान बॉक्स ऑफीसवर नवीन रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज झालाय.

अशातच जवान बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय. जवान जम्मू - काश्मिरच्या संवेदनशील भागात दाखवला जाणार आहे. काय आहे प्रकरण? आम्ही तुला सांगतो.

(Jawan screened at Handwara cinema hall in Jammu & Kashmi)

शाहरुख खानचा जवान जम्मू - काश्मिरमध्ये दाखवला जाणार

शाहरुख खानचा नुकताच रिलीज झालेला 'जवान' उत्तर काश्मीरच्या हंदवारा येथील एका सिनेमा हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

हंदवारा हॉलचा भाग एकेकाळी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा महत्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो.

गेल्या महिन्यात शाहरुख खान स्टारर 2007 च्या स्पोर्ट्स ड्रामा 'चक दे इंडिया' च्या स्क्रीनिंगसह हंदवारा येथील मेक-शिफ्ट सिनेमा हॉलचे उद्घाटन झाले.

हंदवारा येथे 'जवान' च्या स्क्रीनिंगला तरुण आणि जिल्हा अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. एकुणच जम्मू - काश्मिरसारख्या भागात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी शाहरुखच्या टीमने जवानचं स्क्रिनींग करण्याचा घेतलेला निर्णय महत्वाचा आहे.

प्रेक्षकांनी जवान पाहून पैसे परत मागितले

पाकिस्तानी मुलगी असलेल्या सहार राशीदने एक रील व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने सांगितले, "थिएटर मालकांनी मध्यंतरानंतरचा जवान सिनेमा आधी दाखवला. आणि संपूर्ण सिनेमा १ तास १० मिनिटात संपवला. आम्ही विचार करतोय की खलनायक मेला, आता इंटरव्हल कसा होणार. आणि मग आम्हाला कळले की त्यांनी सुरुवातीचा भाग दाखवलाच नाही."

अशी अजब घटना घडल्याचं उघडकीस आलंय. या मुलीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर कमेंट देखील व्हायरल झाल्या. यूजर्सनी कमेंट केल्या की, 'माफ करा, पण हे मजेदार आहे.' 'ही पीक कॉमेडी आहे, 'भारतात बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला जवान असा खराब केल्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवा. तुम्ही तिकीटाचे संपूर्ण पैसे परत घ्या.'

आव्हांडांकडून जवान चा आज विशेष शो

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा मतदार संघातील १८ ते २५ वर्ष वयोगटातील तरुणांसाठी एक खास उपक्रम आयोजित केला आहे. त्याविषयी अधिक माहिती देणारी पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या जवानांसाठी शाहरुखच्या जवानचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाहरुखचा जवान चित्रपट पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT