jawan shah rukh khan #asksrk session king khan give spolier related to jawan showtimings SAKAL
मनोरंजन

Jawan: फॅनने प्रश्न विचारताच शाहरुखने थेट जवानचा स्पॉयलर देऊन टाकला, बघा काय म्हणाला किंग खान

शाहरुखने प्रश्नाचं उत्तर देताना जवानचा स्पॉयलरच सांगुन टाकला

Devendra Jadhav

Jawan: शाहरुख खानचा आगामी जवान सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. शाहरुख खान जवान सिनेमाची भारतात नाही तर जगभर चर्चा आहे.

जवान सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपुर्वी भेटीला आला. सिनेमाचा ट्रेलर पाहून जवान बद्दल आणखी उत्सुकता निर्माण झालीय. जवानच्या रिलीजपुर्वी शाहरुखने त्याच्या फॅन्ससोबत #askSRK सेशन केलं. त्यावेळी एका फॅनने शाहरुखला जवानचा स्पॉयलर विचारला. त्यावेळी शाहरुखने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

(jawan shah rukh khan #asksrk session king khan give spolier related to jawan showtimings)

जवान सिनेमाचा स्पॉयलर सांग ना शाहरुख.. शाहरुख म्हणाला

एका चाहत्याने X ट्विटरवर वर शाहरुख खानला टॅग करत लिहिले होते, 'जवानचं अॅडव्हान्स तिकीट बुक केले आहे. पत्नीसोबत हाँगकाँगमध्ये चित्रपट पाहणार आहे. मी खूप उत्सुक आहे. कृपया चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आम्हाला एक स्पॉयलर द्या."

यावेळी शाहरुखने फॅनने उत्तर देताना त्याचा कमालीचा सेन्स ऑफ ह्यूमर दाखवला. शाहरुख उत्तर देताना म्हणाला, "कृपया चित्रपटाची सुरुवात चुकवू नका. वेळेवर पोहोचा."

एकुणच शाहरुखने स्वतः सांगितल्याने जवान सिनेमाची सुरुवात जबरदस्त असणार यात शंका नाही.

जवानच्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात

सनीच्या गदर २ नंतर शाहरुखच्या जवानची मोठी हवा आहे. एकीकडे सनीच्या गदर २ ची सक्सेस पार्टी जोरदार होत असताना त्यात शाहरुखच्या जवानची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. जवानचा ट्रेलर आल्यानंतर त्याच्या अॅडव्हान्स बूकींगला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

त्याविषयी वेगवेगळ्या पोस्टही शेयर केल्या जात आहेत. मेकर्सनं शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून जवानची अॅडव्हान्स बूकींग सुरु होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर किंग खानच्या जवानच्या अॅडव्हान्स बूकींगला जोरदार सुरुवात झाली आहे.

शाहरुखच्या जवानची विक्रमी अॅडव्हान्स बुकींग

सॅकनिकच्या एका डेटानुसार, २४ तासात जवाननं केवळ तीन मोठ्या नॅशनल सिनेमा चेन्समधून १ लाख ६५ हजार तिकीटांची

अॅडव्हान्समध्ये विक्री केली आहे. यापूर्वी शाहरुखच्या पठाणला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच १ लाख १७ हजार तिकीटांची अॅडव्हान्स बूकींग केली होती. जवान ७ सप्टेंबरला भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांचे होणार “आर्थिक ऑडिट”... आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणार

Kolhapur News : पालकमंत्री आबिटकरांनी झापल्यानंतर महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस, तर कनिष्ठ अभियंता निलंबित

Nagpur : नागपुरात मेंदूज्वर सदृश्य आजाराचा धोका, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू

Fastag : फास्टॅग नाही किंवा पुरेसा बॅलन्स नाही, काळजी करू नका; UPI द्वारे देऊ शकता टोलचे पैसे  

Cough Syrup Warning : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कफ सिरप, बालकांच्या मृत्यूनंतर सूचना; सर्दी, खोकल्‍याची औषधे बालकांना देऊ नका

SCROLL FOR NEXT