jawan Shah Rukh Khan daughter Suhana Khan and Nayanthara at Sri Venkateshwara Swamy in Tirupati  SAKAL
मनोरंजन

Jawan: साऊथ इंडियन पेहरावात शाहरुख मुलीसह वेंकटेश्वर मंदिरात, जवान हिट होण्यासाठी देवाला साकडं

जवान रिलीज होण्यापुर्वी शाहरुखने तिरुपती मधील वेंकटेश्वर मंदिरात केली प्रार्थना

Devendra Jadhav

शाहरुखच्या जवानची सगळीकडे क्रेझ आहे. जवान आता अवघ्या काहीच दिवसात रिलीज होणार आहे. जवानच्या अॅडव्हान्स बुकींगला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुखने जवाननिमित्ताने त्याच्या आधीच्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

जवान सुपरहिट होण्यासाठी शाहरुखने कंबर कसली आहे. अशातच शाहरुख काल ४ सप्टेंबरला तिरुपती येथील वेंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलाय. यावेळी त्याच्यासोबत जवान सिनेमातली सहकलाकार नयनतारा आणि मुलगी सुहाना खान दिसले.

(Shah Rukh Khan at Sri Venkateshwara Swamy temple tirupati)

साऊथ इंडियन पेहरावात शाहरुखने वेधलं सर्वांचं लक्ष

जवान रिलीज होण्याआधी शाहरुख अनेक मंदिरांना भेट देऊन मनोभावे प्रार्थना करताना दिसतोय. यापूर्वी किंग खान माता वैष्णोदेवीच्या दरबारात जम्मूला पोहोचला होता. आणि आता तो आंध्र प्रदेशातील तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी गेलाय.

तिरुपती मधील श्री व्यंकटेश्वर मंदिरात शाहरुखने जाऊन आशीर्वाद घेतले. त्याच्यासोबत मुलगी सुहाना आणि 'जवान' अभिनेत्री नयनताराही होती. ANI ने शाहरुखचा व्हिडीओ शेअर केलाय. शाहरुख साऊथ इंडियन पेहरावात दिसत तो स्मितहास्याने फॅन्सवर प्रेम दर्शवताना दिसतोय.

जवानमधल्या त्या डायलॉगवरुन करणी सेनेने घेतला आक्षेप

दरम्यान शाहरुखचा जवान वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. करणी सेनेने शाहरुखच्या जवानमधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे शाहरुख अडचणीत सापडला आहे.

"एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भुखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था", या संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्या डायलॉगवरुन करणी सेनेनं आक्षेप घेतला आहे. त्यांनी त्याविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे.

शाहरुखच्या जवानने रेकॉर्डब्रेक अॅडव्हान्स बुकींग

शाहरुखच्या जवानने रेकॉर्डब्रेक अॅडव्हान्स बुकींग केलंय. सॅकनिकच्या एका डेटानुसार, २४ तासात जवाननं केवळ तीन मोठ्या नॅशनल सिनेमा चेन्समधून १ लाख ६५ हजार तिकीटांची अॅडव्हान्समध्ये विक्री केली आहे.

यापूर्वी शाहरुखच्या पठाणला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच १ लाख १७ हजार तिकीटांची अॅडव्हान्स बूकींग केली होती. शाहरुखचा जवान येत्या शुक्रवारी ७ सप्टेंबरला रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT