jawan shah rukh khan fan meet and srk give gift to his fans video viral  SAKAL
मनोरंजन

Jawan SRK Fan Meet: कोणी मिठी मारलं, कोणी पाया पडलं, जवान सुपरहिट झाल्याने शाहरुखचं फॅन्सना खास गिफ्ट

शाहरुखने जवान सुपरहिट झाल्यावर त्याच्या फॅनची भेट घेऊन त्यांना सरप्राईज दिलं

Devendra Jadhav

SRK Fan Meet News: शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखची एक झलक बघण्यासाठी त्याचे फॅन्स मन्नतबाहेर तासन् तास उभे असतात. शाहरुखची फॅन फॉलोईंग इतकी आहे की देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचे फॅन्स त्याला भेटायला येत असतात.

अशातच शाहरुखचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला जवान सिनेमा सुपर डूपरहिट झालाय. अशातच शाहरुखने त्याच्या फॅन्सची भेट घेऊन त्यांना खास सरप्राईज गिफ्ट दिलंय.

(jawan shah rukh khan fan meet and srk give gift to his fans video viral)

शाहरुखने घेतली फॅन्सची भेट

शाहरुख खानचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेत. या व्हिडीओत शाहरुख खान स्टेजवर उभा असून तो त्याच्या फॅन्सना खास गिफ्ट देतोय.

शाहरुखचे निवडक फॅन यावेळी दिसत असून लाडक्या किंग खानला याची देही याची डोळा पाहताना फॅन्सना नक्कीच आनंद झाला असेल. यावेळी शाहरुखला भेटताना फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झालेला. यावेळी काही फॅन्सनी शाहरुखला मिठी मारली. काही फॅन्सनी त्याच्या पायाला स्पर्श केला.

शाहरुख प्रत्येक फॅन्सला नम्रपणे भेटत असून त्यांना गिफ्ट देताना दिसतोय.

शाहरुखने फॅन्ससमोर घेतला सुपरहिट डायलॉग

फॅन्सना भेटताना शाहरुखने जवान मधला त्याचा सुपरहिट डायलॉग घेतला. मै कौन हू, पुण्य हू या पाप हू हा डायलॉग खास आवाज काढत म्हटला. यावेळी डायलॉग बोलताना बरोबर बोलतोय ना मी? असं शाहरुखने गमतीशीरपणे फॅन्सना विचारलं.

याशिवाय जवान मधला गाजलेला बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर, हा डायलॉग शाहरुख म्हणताच फॅन्सनी एकच जल्लोष केला.

जवानची कमाई सुसाट

पहिल्या आठवड्यात 'जवान'ची एकूण कमाई 389.88 कोटी रुपये होती, तर दुसऱ्या आठवड्यात 136.1 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने 7.6 कोटींची कमाई केली आहे. तर रिलिजच्या 21व्या दिवशी चित्रपटाने 5.15 करोडची कमाई केली आहे. यासोबत आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण 614 कोटींचा टप्पा गाठला आहे.

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT