jawan Shah Rukh Khan greet and meets fans outside Mannat, after success of 'Jawan' atlee drj96  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: जवानचं यश फॅन्ससोबत साजरं! मन्नतच्या गॅलरीबाहेर येऊन शाहरुख खानने खास अंदाजात मानले आभार

शाहरुखने मन्नतबाहेर येऊन फॅन्सचे आभार मानले आहेत

Devendra Jadhav

Shah Rukh Khan Jawan News: शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर जगभरातुन ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. शाहरुख खानच्या जवानने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय.

शाहरुख कायमच त्याच्या फॅन्सचे आभार मानत असतो. यावेळीही शाहरुखने त्याचं घर अर्थात मन्नतच्या गॅलरीबाहेर येऊन खास अंदाजात फॅन्सचे आभार मानले आहेत

तो आला अन् त्याने सर्वांचं प्रेम जिंकलं

काल रविवारचा दिवस. शाहरुखच्या घराबाहेर त्याचे फॅन्स गर्दी करुन उभे होते. लाडक्या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी शाहरुखचे फॅन्स आतुर होते.

आणि एका क्षणी तो आला. त्याच्या नेहमीच्या अंदाजात. शाहरुखने मन्नतच्या गॅलरीबाहेर येऊन सर्व फॅन्सचे आभार मानले. शाहरुखने निळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. डोळ्यावर गॉगल चढवला होता. शाहरुखने त्याची सिग्नेचर पोझ दिली. याशिवाय सर्व फॅन्सना फ्लाईंग किस दिली.

शाहरुख येताच सर्व फॅन्सनी एकच जल्लोष केला. अनेकजण आपापल्या फोनमध्ये शाहरुखची छबी टिपत होते

शाहरुखच्या जवानचा सिक्वेल येणार, दिग्दर्शक म्हणाला...

खरं सांगतो, प्रेक्षकांच्या अतीव प्रेमामुळे मी जवानचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. विक्रम राठोडसोबतच पुढचा भाग करणार आहे. त्याला सोडून काहीही करता येणार नाही. त्याच्याशिवाय ती गोष्ट शक्यच नाही. किंग खाननं जवानमध्ये विक्रमसिंग राठोड या आर्मी जवानाची भूमिका साकारली होती.

शाहरुखच्या जवानने पठाणचा विक्रम मोडला

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी किंग खानचा शाहरुखचा जवान हा प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला होता. पठाणनंतर शाहरुखचा हा दुसरा प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानं देखील हजार कोटींची कमाई केली होती. भलेही त्यावरुन वाद झाला होता, पण त्यानं विक्रमी कमाई केली.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT