jawan shah rukh khan heartful post for fans who give housefull response for jawan showtimings  SAKAL
मनोरंजन

Jawan Release: "माझ्याजवळ शब्द नाहीत...", जवानला दिलेलं प्रेम पाहून शाहरुखने मानले फॅन्सचे आभार, पोस्ट व्हायरल

शाहरुखने जवानला दिलेल्या प्रेमासाठी फॅन्सचे आभार मानले आहेत

Devendra Jadhav

Jawan News: शाहरुखचा जवान आज रिलीज झाला. जवानला प्रेक्षकांचं अलोट प्रेम मिळतंय. अगदी मध्यरात्रीपासुन ते पहाटेपर्यंत शाहरुखचे फॅन्स जवान पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

शाहरुखच्या जवान पाहण्यासाठी भारतातले बहुतांश सर्व थिएटर हाऊसफुल्ल झालेत. शाहरुखच्या जवान २०२३ बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करणार असं दिसतंय. जवानला फॅन्सनी दिलेलं इतकं प्रेम बघून शाहरुखने प्रेक्षकांचे आभार मानणारी भावुक पोस्टही लिहिली आहे.

(jawan shah rukh khan heartful post for fans who give housefull response for jawan showtimings)

माझं तुमच्यावर खुप प्रेम आहे: शाहरुख

अॅक्शन थ्रिलर जवान रिलीज झाल्यानंतर काही तासांनंतर, शाहरुख खानने X ट्विटरवर जाऊन त्याच्या चाहत्यांसाठी आणि त्याला कायम पाठींबा दर्शवणाऱ्या फॅन्ससाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

शाहरुख म्हणतो, “प्रत्येक फॅन क्लबचे मला आभार मानण्यासाठी मला विशेष वेळ काढावा लागेल, कारण या फॅन्सनी चित्रपटगृहांमध्ये आणि बाहेरही आनंद साजरा केला. या सर्व प्रेमाने मी भारावुन गेलोय. पुढच्या एक - दोन दिवसात मला जरा निवांत वेळ मिळाला की तुम्हा सर्वांसाठी वेळ काढणार आहे. उफ!! #जवानवर प्रेम केल्याबद्दल माझं तुझ्यावर प्रेम आहे."

माहिमच्या गैटी गॅलेक्सी मध्ये जवानचं अनोखं सेलिब्रेशन

माहिमच्या गैटी गॅलेक्सी सिनेमागृहात दर्दी मुंबईकर प्रत्येक सिनेमाचं दणक्यात स्वागत असतात. या थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. शाहरुखचा आज रिलीज झालेल्या जवाननिमित्ताने सुद्धा असंच काहीसं वातावरण दिसतंय.

आज दहीहंडी असल्याने एका गोविंदा पथकाने माहिमच्या गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर हजेरी लावली होती. थिएटरबाहेर भल्या पहाटे या गोविंदा पथकाने ५ थर लावून जवानला अनोखी सलामी दिलीय. यावेळी उपस्थित पब्लिकने हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केलाय

शाहरुखच्या जवानवर उधळल्या पताका

शाहरुख खानचा जवान संपूर्ण भारतात आज रिलीज झालाय. जवानची किती क्रेझ आहे हे पाहायला मिळतंय.

शाहरुखच्या जवानचं जिंदा बंदा गाणं मोठ्या पडद्यावर आल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. थिएटरला पूर्ण स्टेडियमचं रुप आलेलं दिसलं. याशिवाय उपस्थित प्रेक्षकांनी पताकांची उधळण केली. याशिवाय मोबाईल टॉर्च लावून डान्स केला. एकुणच जवानमुळे संपूर्ण थिएटरमध्ये सण असल्यासारखं पब्लिक जल्लोष करत आहे.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT