Madhuri Dixit Comment On Jawan  esakal
मनोरंजन

Madhuri Dixit Reaction On Jawan : 'आता मला...!' 'जवान' वर काय म्हणाली धक धक गर्ल माधुरी?

यासगळ्यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखच्या जवानवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युगंधर ताजणे

Madhuri Dixit Comment On Jawan : शाहरुख खान सध्या तुफान चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याचा जवान नावाचा चित्रपट. गेल्या काही दिवसांपासून जवानची चर्चा होती. पठाणनंतर जवान बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे विक्रम करताना दिसतो आहे.

यासगळ्यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखच्या जवानवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी बॉलीवूडची क्वीन कंगनानं शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव केला होता. कंगनानं कुणाची स्तुती करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. सतत कुणावर टीका करुन प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या कंगनाच्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांनी देखील तिला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव

अशातच बॉलीवूडची धगधग गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरीनं दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होत आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या सौंदर्यानं, नृत्यानं अन् अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या माधुरीच्या पोस्टनं देखील लक्ष वेधून घेतले आहे. माधुरी आणि शाहरुखनं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे.

साऊथच्या अॅटलीनं दिग्दर्शित केलेल्या जवाननं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. जवानमध्ये विजय सेतुपति, नयनतारा, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणि यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. जवान हा येत्या काळात पठाणचे रेकॉर्डही ब्रेक करणार असल्याचे बोलले जात आहे. यासगळ्यात शाहरुखवर बॉलीवूडच्या सेलिब्रेटींकडून होणारा गौरव प्रतिक्रियेचा विषय आहे.

Madhuri Dixit On Jawan

माधुरीनं तिच्या इंस्टावरुन शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिनं जवानचा ट्रेलर तिच्या इंस्टावरुन शेयर केला असून त्यानंतर मी आता शाहरुखचा जवान पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे म्हटले आहे. मी पुन्हा एकदा शाहरुखचा चित्रपट पाहून मुग्ध होण्यास तयार आहे. माधुरीपुर्वी कंगनानं देखील तिच्या पोस्टमधून शाहरुखचं कौतुक केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT