Jawan Shah Rukh Khan Movie Box Office Collection  esakal
मनोरंजन

Jawan Shah Rukh : 'जवान'च्या कमाईत 'अजय देवगणचा'ही मोठा वाटा, काय आहे कनेक्शन?

जवानमधील काही खास गोष्टी या आता सोशल मीडियातून समोर येत आहेत.

युगंधर ताजणे

Jawan Shah Rukh Khan Movie Box Office Collection : किंग खान शाहरुख खानचा जवान हा वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जवाननं तिसऱ्या दिवशीच दोनशे कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अनेक विक्रम त्यानं आपल्या नावावर केले आहेत.

जवानमधील काही खास गोष्टी या आता सोशल मीडियातून समोर येत आहेत. जसं की, जवानची शुटींग ही पुण्यातल्या मेट्रोमध्ये झाली होती. त्यातील ते काही प्रसंग पुण्यातील मेट्रोमध्ये शुट करण्यात आल्याची माहिती पुणे मेट्रोनं ट्विटनं करुन सांगितले आहे. जवानच्या यशात आता अजयचाही मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. त्याचे खास कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

असं म्हटलं जातं की, अजयच्या एनवाय व्हिएफएक्सवाला कंपनीनं आतापर्यत बॉलीवूडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या कंपनीत अत्याधुनिक सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयांवरील ग्राफीक्स करण्यात निर्मात्यांना अडचण येत नसल्याचे बोलले जाते. आता तर शाहरुखच्या जवानला देखील त्याचा प्रत्यय आला आहे. जवानमधील ग्राफीक्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

जवान हा सध्या जिकडे तिकडे तुफान चर्चेचा विषय आहे. त्याची स्टोरी, कलाकारांचा अभिनय, आणि त्यातील व्हिएफएक्स हे प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय आहे. मात्र फार कमी जणांना माहिती आहे की, त्या यशामध्ये अजय देवगणच्या व्हिएफएक्स कंपनीचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. जवानची जी जादू प्रेक्षकांच्या मनात आहे ती अजयच्या व्हिएफएक्स कंपनीमुळे. अशी चर्चा आहे. ते व्हिएफएक्स अजयच्या कंपनीत तयार करण्यात आले आहे.

अभिनेता शाहरुख खान शिवाय अजयच्या व्हिएफएक्स कंपनीनं आतापर्यत मणिरत्नम यांच्या पोनियन सेल्वन, भोला, दृष्यम २, सूर्यवंशी, तू झुठी मैं मक्कार, तानाजी द अनसंग वॉरिअर, सरदार उधम, गंगूबाई काठियावाडी, रनवे ३४, वारिसू, प्रेम रतन धन पायो, तमाशा, बाजीराव मस्तानी, दिलवाले, फोर्स आणि सिंबा सारख्या चित्रपटांमधील व्हिएफएक्सचे काम केल्याचे सांगण्यात येते. अमर उजालाच्या एका खास लेखामध्ये याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

अजय देवगणनं त्याची व्हिएफक्स कंपनी एनवाय व्हिएफएक्सवालाची सुरुवात २०१५ मध्ये सुरु केली होती. त्या कंपनीचे नाव त्यानं मुलांच्या पहिल्या अक्षरावरुन ठेवलं होतं. अजयला न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. त्यानं एन आणि वाय असे त्या कंपनीला नाव दिले आहे. ती नावं न्यासा अन् युगच्या नावावरुन ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT