Jawan Movie  esakal
मनोरंजन

Jawan Movie : 300 कोटींचं बजेट, किंग खानचं एक लाखांचं शर्ट, 1 हजार डान्सर! शाहरुखचा नाद करायचा नसतोय!

एक हजार कोटींची कमाई करणारा चित्रपट म्हणून किंग खानच्या या चित्रपटाचे कलेक्शन खूप काही सांगून जाणारे होते.

युगंधर ताजणे

Jawan Shah Rukh Khan Movie Budget Compare : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाणला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं सहाशे कोटींहून अधिक कमाई केली होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मात्र प्रचंड साथ दिली होती. किंग खानला लोकांनी त्याच्या वादासकट स्विकारले.

देशातील अनेक राज्यांमध्ये शाहरुखच्या चित्रपटावरुन वाद झाला होता. त्याचे चित्रपट थिएटरमध्ये दाखवू नयेत असे काही धर्म संघटनांनी फतवेही काढले होते. त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. शाहरुखच्या कोट्यवधी चाहत्यांनी त्याचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. यावर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पठाणचे नाव घेतले गेले.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

एक हजार कोटींची कमाई करणारा चित्रपट म्हणून किंग खानच्या या चित्रपटाचे कलेक्शन खूप काही सांगून जाणारे होते. त्यामुळे त्याच्या आगामी जवान नावाच्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या चित्रपटातील गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. तीनशे कोटींचे बजेट असणाऱ्या जवानमध्ये शाहरुखचा लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

शाहरुख हा बॉलीवूडचा सर्वाधिक लोकप्रिय असा अभिनेता आहे. केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये त्याचे चाहते आहेत. अशात त्याचा कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित व्हायचा असल्यास त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखनं जवानच्या शुटींगमध्ये परिधान केलेल्या शर्टची किंमत ही एक लाख रुपये असल्याचे बोलले जातेय.

शाहरुखनं जवान मधील एका गाण्यासाठी तब्बल एक हजार डान्सर एकत्र आणले होते. अशी माहिती आहे. यावरुन आपल्याला जवान आणि या चित्रपटाचा डामडौल लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ७ सप्टेंबर रोजी शाहरुखचा जवान थिएटरमध्ये रिलिज होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये साऊथचा विजय सेतूपती, नयनतारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पठाणनं एक हजार कोटींची कमाई केल्यानंतर आता शाहरुखच्या जवानकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट देखील पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याची चर्चा आहे. सध्या पठाण आणि जवानच्या मेकिंगची चर्चा आहे. पठाणची निर्मिती २५० कोटींमध्ये करण्यात आली होती. जवानचा निर्मितीचा खर्च ३०० कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT