Jawan SRK New Look  
मनोरंजन

Jawan SRK New Look : अभी तो मैं 'जवान' हू, शाहरुख दिवसेंदिवस तरुण होतोय!

पठाणनंतर चाहत्यांना आता शाहरुखच्या जवानचे वेध लागले आहे. त्याच्या प्रीव्ह्युला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jawan Shah Rukh Khan New Look Viral : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा सध्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण जवानचा प्रदर्शित झालेला प्रीव्ह्यू. त्या प्रीव्ह्यूला एसआरकेच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शाहरुख सध्या भलत्याच फॉर्मात आहे. पठाणच्या मोठ्या यशानंतर त्याच्या जवान चित्रपटाकडून चाहत्यांना खास अपेक्षा आहेत.

दीपिका पदुकोण, विजय सेतूपती, गिरीजा ओक, सान्या मल्होत्रा यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. मागील दोन दिवसांपासून शाहरुखची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. जवानचा व्हायरल झालेला प्रीव्ह्यू केवळ चाहत्यांचे नाही तर चित्रपट समीक्षकांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. वयाची साठी ओलांडलेल्या शाहरुखची चाहत्यांमधील क्रेझ कायम असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वेळेला त्याच्या पठाण चित्रपटानं वेगळी वातावरण निर्मिती केली होती.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

आता किंग खानच्या जवाननं सोशल मीडियावर मोठमोठे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. त्यात जवानच्या नव्या लूकनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यानं टक्कल केलेला लूक काही वेगळाच आहे. अशात सोशल मीडियावर शाहरुखचा पुन्हा एक हटके लूकही समोर आला आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. किंग खाननं त्याच्या #AskSrk सेशनमधून त्यावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरही दिली आहेत.

शाहरुखचा जवान हा चित्रपट हा रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन आहे. ज्याचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले असून गौरी खाननं निर्मात्या तर गौरव वर्मा सह-निर्मात्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : धबधब्यात दगडांवरून पाय घसरून पडला, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT