Jawan Trailer released Shah Rukh Khan smashes up break pathaan  esakal
मनोरंजन

Jawan Trailer : 'सो कली, नो डील' शाहरुखच्या 'जवान'नं अल्लू अर्जुनलाही फोडला घाम!

अॅटली दिग्दर्शित जवानचा यापूर्वी प्रीव्हयु ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

युगंधर ताजणे

Jawan Trailer released Shah Rukh Khan samshed up break pathaan : किंग खान शाहरुखच्या ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते त्या जवानचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. नेहमीप्रमाणे शाहरुखच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यातील शाहरुखच्या लूक आणि अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे.

अॅटली दिग्दर्शित जवानचा यापूर्वी प्रीव्हयु ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. किंग खान शाहरुखची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये साऊथची नयनतारा, बॉलीवूडची दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणि आणि सुपरस्टार विजय सेतुपति यांच्या भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. त्याच्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

यापूर्वी शाहरुखच्या पठाणला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाणणं एक हजार कोटींची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यावरुन पठाणनं केलेली कमाई किती मोठी होती हे दिसून येईल. शाहरुखच्या या चित्रपटावरुन साऱ्या देशभरात आंदोलनं, निदर्शनंही करण्यात आली होती. त्यात दीपिकानं भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन खूप तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.

जवानचा ट्रेलर प्रदर्शित होऊन अर्धा तास होत नाही तोच त्याला १.६ मिलियन व्हयुज मिळाल्याचे दिसून आले आहे. यावरुन शाहरुखचा चाहतावर्ग किती मोठा आहे आणि त्याच्या नावाला मिळणारा प्रतिसाद किती तगडा आहे हेही कळून येते. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगला मिळणारा प्रतिसादही प्रचंड असून परदेशातही जवाननं प्री तिकीट बुकींगचे रेकॉर्ड ब्रेक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून जवान रिलिज व्हायरला फक्त काहीच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शाहरुख आणि चित्रपटाची टिम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चाहते त्याच्या ट्रेलरचीही आतुरतेने वाट पाहत होते. आता तो ट्रेलर चाहत्यांचा चर्चेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2026

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT