Jawan Trailer Shah Rukh Khan Dialogue Alia Bhatt Name  esakal
मनोरंजन

Jawan Trailer King Khan : 'चाहिए तो आलिया भट'!, शाहरुखनं नेमकी कोणती हिंट दिली? 'त्या' नावानं वेगळ्याच चर्चेला उधाण

जवानचा ट्रेलर होऊन अवघे काही तास झाले नाहीत तोच त्याला मिळालेले व्ह्युजनं नेटकऱ्यांना थक्क केले आहे.

युगंधर ताजणे

Jawan Trailer Shah Rukh Khan Dialogue Alia Bhatt Name : जवानचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला असून त्यावर चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. त्यांनी आपल्या लाडक्या किंग खान शाहरुखचं तोंड भरुन कौतुकही केलं आहे. पठाणनंतर शाहरुखचा या वर्षांतला शाहरुखचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

शाहरुखचा चित्रपट म्हटल्यावर त्याची चर्चा होतेच. मग तो पठाण असो वा जवान. जवानचा ट्रेलर होऊन अवघे काही तास झाले नाहीत तोच त्याला मिळालेले व्ह्युजनं नेटकऱ्यांना थक्क केले आहे.त्यावरुन हा चित्रपट पठाणचेही रेकॉर्ड ब्रेक करणार असे बोलले जात आहे. पठाणनं हजार कोटींची कमाई केली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

यासगळ्यात शाहरुखनं जवानच्या ट्रेलरमध्ये एक संवाद म्हटला आहे.त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यानं आलिया भट्टचे नाव घेत वेगळाच क्ल्यु चाहत्यांना दिला आहे. यापूर्वी देखील शाहरुखनं काही दीपिकाच्या नावाचा उल्लेख न करता तिला चित्रपटाच्या प्रीव्हयुमध्ये सहभागी करुन घेतले होते. तोपर्यत जवानमध्ये दीपिका दिसणार याविषयी फारशी माहिती नव्हती. आलियाचे नाव आल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

तुम क्या चाहते हो असा प्रश्न जवानमधील शाहरुखला विचारल्यानंतर त्याचा तो डायलॉग आता नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. शाहरुख म्हणतो, चाहिए तो आलिया भट....असे किंग खान म्हणतो. यामुळे शाहरुखनं आलियाचे नाव काही उगाचच घेतलेले नाही. त्यामागे काही कारण असावे अशी शक्यता चाहत्यांना आहे. आलियाचा देखील जवानमध्ये खास कॅमिओ तर नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

शाहरुखच्या त्या डायलॉगनं नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही भन्नाट आहेत. काहींनी तर शाहरुखनं आलियाला देखील जवानमध्ये सहभागी करुन घेतले आहे. असे म्हटले आहे. दुसऱ्यानं तर किंग खान जवानमधून चाहत्यांना मोठं सरप्राईज देणार असल्याचे म्हटले आहे. शाहरुखचा जवान हा सप्टेंबरच्या ७ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

जवानच्या स्टारकास्टविषयी बोलायचे झाल्यास त्यात साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपति, प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा, प्रियामणि, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक यांच्याही भूमिका आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत घर नाही सांगून बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा चौपाटीवर आलिशान फ्लॅट, खरेदी केल्यापासून बंदच, कोट्यवधी रुपये किंमत

Panchang 13 August 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

Solapur News:'५० हजार बहिणी पाठविणार देवाभाऊंना राख्या'; स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महिला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न

Latest Marathi News Updates : माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ED चे समन्स; बेटिंग अ‍ॅप प्रकरणी आज होणार चौकशी

Zilla Parishad : गट, गण प्रारूप रचनेवर सुनावणी पूर्ण; विभागीय आयुक्तांकडून ११५ सूचना व हरकती मान्य; ८८ फेटाळल्या

SCROLL FOR NEXT