Jawan Trailer Shah Rukh Khan King Khan esakal
मनोरंजन

Jawan Preveu : 'जब मैं व्हिलन बनता हू, तब मेरे सामने कोई भी हिरो...' किंग खानचा पुन्हा धमाका

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा नेहमीच त्याच्या हटकेपणासाठी चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

युगंधर ताजणे

Jawan Trailer Shah Rukh Khan King Khan : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा नेहमीच त्याच्या हटकेपणासाठी चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. जगभरातून तब्बल हजार कोटींची कमाई करुन शाहरुखनं आपणच बॉलीवूडचे किंग खान आहोत हे दाखवून दिले होते.

आता शाहरुखच्या आगामी जवान या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. पठाणमध्ये शाहरुखनं एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती. स्पाय म्हणून शाहरुखचा आणखी एक वेगळा प्रयत्न जवानमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, टॉलीवूडचा सुपरस्टार विजय सेतूपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

पठाण प्रदर्शित होण्यापूर्वी मोठा वाद झाला होता. शाहरुखच्या यापूर्वीच्या चित्रपटांवरुन मोठा वाद झाल्याचे दिसून आले आहे. मात्र पठाणनं तर शाहरुखवर वेगवेगळे आरोपही केले होते. त्याला किंग खाननं आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून उत्तर दिले होते. एका कार्यक्रमामध्ये देखील त्यानं सध्या सोशल मीडियावर एखाद्या कलावंताच्या बाबत जे काही होते त्याला प्रेक्षक खरं मानायला लागतात. तेव्हा आता प्रेक्षक किंवा चाहते यांचे विचार करणे देखील सोशल मीडिया करतात. असे तो म्हणाला होता.

जवानविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये काही युवतींची फौज घेऊन तो लढताना दिसतो आहे. त्यात शाहरुखचा स्वॅग काही वेगळाच आहे. या चित्रपटामध्ये त्यानं त्याच्या लूकवर देखील मेहनत घेतल्याचे दिसते. अॅक्शन सीन तर हॉलीवूडला धडकी भरवतील असे आहेत. पठाणमधील काही सीनवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. त्याची दखल एसआरकेनं त्याच्या या चित्रपटामध्ये घेतल्याचे दिसते.

जवानमध्ये शाहरुखच्या तोंडी जे संवाद आहेत त्याची चर्चा होताना दिसते आहे. त्यात एका दृश्यामध्ये तो म्हणतो, 'जब मैं व्हिलन बनता हू तब मेरे सामने कोई भी हिरो मेरे सामने नही टिकता...' शाहरुखचा हा संवाद सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्याला कमालीची लोकप्रियताही मिळाली आहे. आतापर्यत त्याच्या लाखो चाहत्यांनी शाहरुखचे कौतूक केले आहे. त्याच्या या आगामी चित्रपटासाठी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

शाहरुखचा जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले असून त्यामध्ये जवान या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विजय सेतुपती, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर हे कलाकारही दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT