Kamal Haasan praises SRK ahead of 'Jawan' release esakal
मनोरंजन

Kamal Haasan On SRK Jawan : 'किंग खान म्हणजे देशातील....!' साऊथच्या कमल हासन यांनी शाहरुखचं केलं कौतुक

येत्या सात सप्टेंबर रोजी शाहरुखचा जवान हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीमध्ये किंग खानचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

युगंधर ताजणे

Kamal Haasan praises SRK ahead of 'Jawan' release : शाहरुखच्या जवानच्या ट्रेलरवर आता जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. किंग खाननं भलेही यावेळी साऊथच्या कलाकारांना त्याच्या चित्रपटात स्थान दिले असले तरी दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील मोठ्या कलाकारानं शाहरुखचं कौतुक केलं आहे.

येत्या सात सप्टेंबर रोजी शाहरुखचा जवान हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीमध्ये किंग खानचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसादही मिळाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. पठाणनं एक हजार कोटींची कमाई केली होती. त्यामुळे त्याच्या जवानकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी शाहरुख्या जवानचा ट्रेलर पाहिल्यावर त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या खास शैलीत शाहरुखची स्तुती केली आहे. त्याचं झालं असं की, काल चेन्नईमध्ये जवानचे ऑडिओ लॉचिंग कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते. त्यावेळी कमल हासन उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी किंग खानचे कौतुक केले आहे.

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये शाहरुखसोबत साऊथचा विजय सेतुपति, नयनतारा, प्रियामणि तसेच सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक आणि सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सात सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे साऱ्या बॉलीवूडचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट शाहरुखच्या पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करेल अशी चर्चा होताना दिसत आहे.

कमल हासन यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, जवान या चित्रपटाच्या निमित्तानं भारतातील नवोदित कलाकारांमधील टँलेंट समोर येताना दिसत आहे. किंग खानकडे आपण प्रेमाचे प्रतिक म्हणून पाहिले पाहिजे. गेल्या तीस वर्षांपासून त्यानं त्याची ही प्रतिमा जपली आहे.त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादच आपल्याला खूप काही सांगून जातो. त्यानं खूपदा आपली लव्हेबल इमेज जपून ठेवली आहे.

कमल हासन यांच्या कौतुकानंतर सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. मी शाहरुखच्या या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्याच्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करेल यात शंका नाही. अशा शब्दांत कमल हासन यांनी कौतुक केले आहे. जवान हा शाहरुखचा पहिलाच पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे. तो हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT