jawan twitter review shah rukh khan jawan showtimings review starcast songs other details  SAKAL
मनोरंजन

Jawan Twitter Review: एकच शब्द; "ब्लॉकबस्टर"! तो आला अन् त्यानं जिंकलं, शाहरुखचा जवानवर प्रेक्षक फिदा

शाहरुखच्या जवानचा ट्विटर रिव्ह्यू समोर आलाय

Devendra Jadhav

Jawan Twitter Review: शाहरुख खानचा जवान आज ७ सप्टेंबरला भारतात नाही तर जगभरात रिलीज झालाय. जवान पाहण्यासाठी गेले २ दिवस प्रेक्षक तिकीटगृहाबाहेर रांगा लावुन उभे होते. स्वतःची झोपमोड करुन मध्यरात्री दोन वाजता जवानचं तिकीट बूक करण्यासाठी प्रेक्षक जीवाचं रान करत आहे.

आज अनेक ठिकाणी पहाटे ५ वाजता जवानचा फर्स्ट डे फर्स्ट शो दाखवण्यात आला. हा शो पाहून अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात. वाचा जवानचा Twitter Review

एका यूजरने लिहिले - शाहरुख खानने आपल्या एनर्जी आणि स्वॅगने अख्खा सिनेमा खाल्लाय. जवान प्रत्येक प्रकारे एक चांगला सिनेमा आहे. मास स्टोरी, उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि अॅक्शन स्टंट. अवश्य पहा.

याशिवाय आणखी एका युजरने लिहिले, "ओरडून ओरडून घसा बसला. प्रेक्षक शाहरुखच्या एन्ट्रीला वेडे झालेत. "

सिनेसमीक्षक तरण आदर्शने जवान पाहिल्यावर सिनेमाला ५ स्टार दिलेत. "B L O C K B U S T ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ #Atlee ने एक उत्कृष्ट सिनेमा सादर केला आहे, जो मानवी भावना आणि अॅक्शनचा एक सुखद धक्का आहे. हे वर्ष किंग खानचे आहे #ShahRukhKhan𓃵. #विजयसेतुपती #नयनतारा आणि इतर कलाकारांनी छान काम केलंय. चुकवू नका !!"

मोशा नावाने लोकप्रिय असलेल्या ट्वीटर युजरने जवान पाहून रिव्ह्यू दिलाय. #जवान अर्ली रिव्ह्यू B L O C K B U S T E R: ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ #Atlee ने एक जबरदस्त सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय #ShahRukhKhan𓃵 #विजयसेतुपती #नयनतारा आणि इतर सर्व कलाकारांनी लय भारी काम केलंय

एका ट्विटर युजरने लिहिले की, शाहरुख खानची सिनेमातली एन्ट्री जबरदस्त होती. पहिला हाफ लय भारी तर मध्यंतरानंतर अंगावर शहारे आणणारे प्रसंग आहेत. अनिरुद्धचं बॅकग्राऊंड म्युझिक कमाल आहे. अॅटलीने लिहीलेली पटकथा लय भारी

शाहरुखचा या वर्षातला दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा

एकुणच शाहरुख आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं असंच म्हणता येईल. शाहरुखने पुन्हा एकदा भारतातल्या तमाम प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचुन आणलंय. शाहरुखचे फॅन असे वा नसो प्रेक्षक मात्र जवान पाहण्यासाठी एकच कल्ला करत आहेत.

आता शाहरुखचा जवान बॉक्स ऑफीसवर किती कमाई करतो हे पाहणं उत्सुकतेचा विषय आहे. पठाण नंतर शाहरुखचा जवान हा या वर्षातला दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरेल यात शंका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT