jay jay swami samartha  
मनोरंजन

अक्षय मुदवाडकर साकारणार ' स्वामी समर्थांची भूमिका'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - नवीन वर्षात प्रेक्षकांना विविध विषयांवरील मालिकांची पर्वणी मिळणार आहे. यात काही सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय विषयांवरील मालिकांचा समावेश आहे. स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका सध्या सुरु आहे. तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली आहे.

या मालिकेतील प्रमुख भूमिका कोण साकारणार याविषयी उत्सुकता होती. आता ती प्रमुख भूमिका अक्षय मुदवाडकर हा अभिनेता साकारणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात ज्यांना वंदनीय, पूज्य मानलं जातं, त्या स्वामी समर्थांच्या मालिकेबद्दल अनेकांना कमालीची उत्सुकता होती. यामुळे  भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अक्षयनं ही व्यक्तिरेखा साकार केली आहे. अक्षय हा मुळचा नाशिकचा. लहानपणापासून त्यानं अभिनयाची आवड जोपासली आहे. त्यानं यापूर्वी अनेक हौशी, प्रायोगिक आणि व्यवसायिक नाटकांतून अभिनय केलेला आहे. यात गांधी हत्या आणि मी, द लास्ट व्हॉइसरॉय या नाटकांमध्ये भूमिका केली आहे.

यापूर्वी त्यानं ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रावर निराशेचे मळभ दाटले होते. ते आता काही अंशी कमी झाले आहे. मोठ्या प्रमाणावर मालिका आणि चित्रपट यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे. कित्येक मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या विषयांवर कलाकृती निर्मितीचा घाट घातला आहे. त्याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. मराठी मनोरंजन वाहिन्यांवर सातत्याने नवनवीन मालिका आपल्या भेटीस येत असल्यानं प्रेक्षकांमध्येही आनंद व समाधानाची भावना आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT