Amitabh Bachchan And Jaya Bachchan  esakal
मनोरंजन

Jaya Amitabh Bachchan Property: १७ महागड्या कार्स, ९५ कोटींची ज्वेलरी अन्...अमिताभ, जया बच्चन यांची एकुण प्रॉपर्टी किती?

जया बच्चन(Jaya Amitabh Bachchan Property) यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एकुण संपत्तीचा आकडा जाहीर केला आहे.

युगंधर ताजणे

Jaya Amitabh Bachchan Net Worth : बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची बॉलीवूडमधील क्रेझ काही वेगळीच आहे. वयाची ८० वर्ष पूर्ण केल्यानंतरही त्यांच्या नावाची महती काही कमी झालेली नाही. या वयातही ते तितक्याच (Amitabh Bahchan Latest News) जोमानं काम करताना दिसत आहेत. नवोदित कलाकारांनाही त्यांचा हेवा वाटावा असा परफॉर्मन्स बिग बी यांचा राहिला आहे. सध्या ते आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची वेगळी बातमी समोर आली आहे.

राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी त्यांच्या संपत्तीची घोषणा केली (Jaya Bachchan Latest News) आहे. अमिताभ आणि जया बच्चन या दोन्ही सेलिब्रेटींचा चाहतावर्ग मोठा आहे. हे दोन्ही सेलिब्रेटी त्यांच्या वेगळेपणामुळे नेहमीच चाहत्यांचा अन् नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय राहिल्या आहेत. (Amitabh Jaya Property) आगामी काळातील राज्यसभेच्या निवडणूकीसाठी समाजवादी पार्टीकडून उमेदवारीसाठी नाव घोषित करण्यात आले आहे.

जया बच्चन ((Jaya Bachchan) यांनी त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्यासह आपल्या संपत्तीची घोषणा केली असून त्यांची एकुण संपत्ती ही १हजार ५७८ कोटींचे सांगण्यात येत आहे. मनी कंट्रोलनं याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. जया बच्चन यांनी शेवटी करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये काम केले होते. त्यात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्या सोबत दिसल्या होत्या.

जया बच्चन यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केलाआहे. त्यात त्यांनी २०२२ - २०२३ या वर्षातील संपत्ती १.६३ कोटी रुपये सांगितली आहे. त्याच वर्षी एकट्या अमिताभ बच्चन यांची संपत्ती ही २७३. ७४ कोटी रुपयांची असल्याचे दिसून आले आहे. त्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्यानुसार जया बच्चन यांच्या बँक अकाउंटमध्ये १०.११ कोटी रुपये आहे. टाईम्स ऑफ इंडियानं केलेल्या उल्लेखानुसार त्यांच्याकडे ४०.९७ कोटी रुपयांची ज्वेलरी असून ९.८२ लाख रुपयांची कार आहे.

अमिताभ यांच्याकडे ५४.७७ कोटींची ज्वेलरी आणि दोन मर्सिडिज असून एक रेंज रोव्हरसह आणखी १६ वेगवेगळ्या कार्स आहेत. गेल्या वर्षी अमिताभ यांनी आपल्या लाडक्या लेकीला प्रतीक्षा नावाचा बंगला गिफ्ट म्हणून दिला होता. त्यासाठी त्यांनी ५०.६५ लाखांची स्टँम्प ड्युटी होती.

अमिताभ यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, त्यांचा शेवटचा चित्रपट गणपथ होता. त्यात टायगर श्रॉफ त्यांच्यासोबत दिसला होता. याशिवाय अभिषेक बच्चनच्या घूमर नावाच्या चित्रपटामध्ये त्यांनी कॅमिओ केला होता. आता ते २८९८ मध्ये दिसणार आहेत. त्यात दीपिका, प्रभास आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fighter Jet Crash: मोठी बातमी! बांगलादेशमध्ये हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले, एकाचा मृत्यू, अनेक जखमी, Video Viral

अहान पांडे आणि अनित पड्डा आहेत तरी कोण? 'सैय्यारा'मधील गाजलेल्या 'या' जेन झी जोडीविषयी जाणून घ्या सर्वकाही

मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?

Harbhajan Singh: 'तूच माझ्या बाबाला मारलंस ना?' जेव्हा श्रीसंतच्या मुलीने हरभजनला केला थेट सवाल

Video : मैत्रीण दुबईत पोहोचली अन् मी अजून ट्रॅफिकमध्येच... बंगळुरुमधील महिलेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT