Jaya Bachchan Angry On paparazzi  esakal
मनोरंजन

Jaya Bachchan : 'मी बहिरी नाही, ओरडू नको'! जया बच्चन पुन्हा संतापल्या! झालं काय?

जयाजी यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

युगंधर ताजणे

Jaya Bachchan Angry On paparazzi : बॉलीवूडमध्ये ज्यांच्या रागीटपणाच्या कित्येक गोष्टी प्रसिद्ध आहेत अशा जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जयाजी यांना बऱ्याचदा चिडण्यासाठी कोणतेही कारण पुरते असे दिसून आले आहे. आता तर त्या एका कॅमेऱामॅनवर संतापलेल्या दिसत आहेत.

यापूर्वी देखील जयाजी यांनी पत्रकारांवर आणि पापाराझ्झींवर आगपाखड केली आहे. त्यांना पत्रकारांनी प्रमाणापेक्षा जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाही. एखादा तिकरस प्रश्न विचारल्यास त्यावर जयाजी बोलत नाही. पत्रकारांनी आग्रह केल्यावर मग रागावतात हे दिसून आले आहे. त्याची चर्चाही होती. खुद्द अमिताभ यांनी देखील काही मुलाखतींमधून जयाजी यांची ती गोष्ट मान्य केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

त्याचे झाले असे की, रॉकी और रानी की प्रेम कहाणीचा मुंबईत प्रीमिअर होता. त्याला चित्रपटाची मोठी स्टारकास्ट हजर होती. जयाजी देखील आल्या होत्या. दोन दिवसांनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी काही पत्रकारांनी जयाजी यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा संताप झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर त्यांनी मी काही बहिरी नाही, मला ऐकायला येते आणि जरा आरामात प्रश्न विचारा. असे म्हटले आहे.

जयाजी यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जयाजी यांना पाहताच पत्रकार ओरडू लागले. त्यावर त्यांनी संतापून दिलेली प्रतिक्रिया अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, जयाजी या अभिषेकची वाट पाहत थांबल्या आहेत. त्यामुळे पापाराझ्झी सतत त्यांचे फोटो घेत होते. पापाराझ्झींनी त्यांना विनंती केली की, आम्हाला फोटो हवे आहेत.

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. त्याचे दिग्दर्शन करण जोहरनं केले असून त्यात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT