Jaya Bachchan lashes out again media at Ira Khan -Nupur Wedding Reception video goes viral SAKAL
मनोरंजन

Ira Khan-Nupur Wedding Reception: "तुम्ही शिकवू नका!", जया बच्चन पुन्हा भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

आमिरच्या लेकीच्या लग्नात जया बच्चन पापराझींवर भडकलेल्या दिसल्या

Devendra Jadhav

Ira Khan-Nupur Wedding Reception Jaya Bachchan Video: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन अनेकदा पापाराझींसमोर येणं टाळतात. जेव्हाजेव्हा पापाराझी त्यांचे फोटो - व्हिडीओ क्लिक करतात तेव्हा जया त्यांच्यावर रागावतात.

अनेकदा समोर असलेल्या मीडियाला जया बच्चन यांच्या रागाचा सामना करावा लागतो. शनिवारी संध्याकाळी जया त्यांची लेक श्वेता बच्चनसोबत आमिर खानची मुलगी आयराच्या वेडिंग रिसेप्शनला गेल्या होत्या. त्यावेळीही त्या मीडियावर रागावताना दिसल्या.

(Jaya Bachchan lashes out again media at Ira Khan -Nupur Wedding Reception video goes viral)

जया बच्चन पुन्हा रागावल्या

आयरा - नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला जया बच्चन उपस्थित होत्या. त्यांनी जेव्हा रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली तेव्हा पापाराझींनी त्यांना विशिष्ट ठिकाणी येऊन पोज देण्याची विनंती केली. तेव्हा मला शिकवू नका काय करायचं ते, असं म्हणत जया बच्चन पापाराझींवर रागावल्या.

याशिवाय जया यांची लेक श्वेता त्यांच्यासोबत पोज देत होती तेव्हाही पापाराझी समोरून ओरडत होते. तेव्हा जया म्हणाल्या, "तुम्ही आम्हाला अँगल शिकवता!!".

अशाप्रकारे जया बच्चन यांचा राग अनावर झालेला दिसला.

यापूर्वीही जया बच्चन पापाराझींवर रागावल्या आहेत

काही दिवसांपुर्वी हेमा मालिनी यांनी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला तेव्हा अनेक सेलिब्रिटींनी एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस मुंबईत सेलिब्रेट केला होता.

जया बच्चन देखील यावेळी उपस्थित होत्या. त्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसोबत रेड कार्पेटवर दिसल्या. त्यावेळीही पापाराझींनी केलेल्या गोंधळामुळे जया बच्चन त्यांच्यावर भडकल्या दिसल्या.

आयरा - नुपूरचं रिसेप्शनबद्दल

आमिर खानची लेक आयरा खानने 3 जानेवारी तिचा बॉयफ्रेंड जोडीदार नुपूर शिखरेसोबत रजिस्टर मॅरेज केलं. हे लग्न ताज लँड्स एंड येथे झाला. या लग्नाला या दोघांचं कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नंतर, या जोडप्याने 10 जानेवारी रोजी उदयपूर येथील ताज अरावेली येथे ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.

तर काल रात्री वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) स्थळी नुपूर - आयराच्या रिसेप्शन बॉलिवूड तारे - तारकांची मांदियाळी दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

हर्षवर्धन राणे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये? पुण्याजवळील पानशेतमध्ये दोघांची गुपचूप ट्रिप? एका पोस्टने वाढली चर्चा

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT