Jaya Bachchan On Navya Naveli Nanda Show  esakal
मनोरंजन

Jaya Bachchan On Navya Naveli Nanda Show : 'खरं सांगू मला काहीही फरक पडत नाही पण...', नातीच्या शो मध्ये जयाजी स्पष्टच बोलल्या!

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही देखील आता बॉलीवूडमधील मोठी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Jaya Bachchan On Navya Naveli Nanda Show: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही देखील आता बॉलीवूडमधील मोठी सेलिब्रेटी आहे. नव्या नवेलीच्या पोस्ट आणि तिचं पॉडकास्ट आणि तिची वक्तव्यं ही नेहमीच चर्चेत असतात. तिच्या पॉडकास्टला वेगवेगळे पुरस्कारही मिळाले आहेत.

सध्या नव्या नवेलीच्या व्हाट द हेल नावाच्या पॉडकास्टमध्ये तिची आजी प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन सहभागी झाल्या होत्या. यावेळी तिनं आजीला वेगवेगळ्या विषयांवर बोलते केल्याचे दिसून आले. जयाची यांचा परखडपणा, त्यांची स्पष्टपणे मतं मांडण्याची भूमिका आणि पापाराझ्झींना बिनधास्तपणे बोलण्याची सवय अनेकांना माहिती आहे. त्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.

आतापर्यत जयाजींचे पापाराझ्झींसोबतचे झालेले वाद आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय राहिले आहेत. या सगळ्या बाबत नव्यानं जया बच्चन यांना प्रश्न विचारला होता. त्यावर जयाजी यांनी दिलेलं उत्तर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. नव्याच्या व्हाट द हेल च्या दुसऱ्या सीझनचा पहिला एपिसोड रिलीज झाला आहे. त्यात बच्चन कुटूंबातील जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांची वेगळी केमिस्ट्री प्रेक्षकांना दिसणार आहे.

तुम्हाला नव्यानं काय करायला आवडते असा तो प्रश्न होता. त्यावर जयाजी यांनी म्हटलं होतं की, मी देखील सध्या वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असते. जे माझ्यावर वेगवेगळे मीम्स तयार करतात त्यांच्याकडून नवीन माहिती जाणून घेत असते. या शो मध्ये नव्यानं आजीवर जे मीम्स तयार झाले आहेत त्यातून समोर आलेला जया इंग नावाचा शब्दप्रयोगही यावेळी केला. तेव्हा श्वेता गमतीत म्हणते की, तुम्ही तेव्हा जास्त रागात असता तेव्हा हा शब्दप्रयोग योग्य ठरतो का, माझ्यासाठी हा काही कौतुकाचा विषय नाही पण ठीक आहे.

सध्या आपल्याकडील जे पॉप फेनोमेनन कल्चर आहे त्याविषयी तुमचे म्हणणे आहे, असा प्रश्न नव्यानं जया बच्चन यांना विचारला होता, त्यावर त्या म्हणाल्या की, मला काही वाटत नाही जेव्हा लोकं माझी टिंगल करतात, त्यावरुन मीम्स तयार करतात. पण एक आहे जी लोकं मीम्स तयार करतात ते खूपच वाईट आहेत. त्यांना त्यापेक्षा चांगले मीम्स तयार करता येतील. त्यावर नव्या म्हणते की, तुम्ही का त्यांना शिकवत नाहीत, तिच्या त्या विधानावर जया बच्चन यांनी मी त्यांना का शिकवू असे म्हणत त्यांचा परखडपणा दाखवून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT