Jaya Bachchan Sakal
मनोरंजन

Jaya Bachchan: 'बस झालं आता...' जया बच्चन पुन्हा पापाराझींवर भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

जया बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पापाराझींवर रागावताना दिसत आहे.

Aishwarya Musale

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन अनेकदा आपल्या रागामुळे चर्चेत असतात. जया बच्चन आणि पापाराझी यांच्यातही छत्तीसचा आकडा आहे. जया बच्चन यांनी अनेक वेळा पापाराझींवर आपला राग व्यक्त केला आहे. खरं तर, अलीकडेच जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन आदित्य चोप्राच्या घरी जाताना दिसल्या आहेत.

विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर रागावताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जया पापाराझींना त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगताना दिसत आहे. इतकंच नाही तर फोटो आणि व्हिडिओ क्लिक केल्याबद्दल अभिनेत्री त्यांना ओरडत आहे.

जया बच्चन यांचे हे वागणे पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, वापरकर्ते जया यांना बरे वाईट बोलत आहेत. एका यूजरने त्यांना मीडियाचा शत्रू म्हटले आहे. त्याच वेळी, आणखी एकाने लिहिले की, खूप ईगो आणि अ‍ॅटिट्यूड आहे.'

आणखी एका युजरने लिहिले आहे की त्यांची समस्या काय आहे? मात्र, जया बच्चन यांनी पापाराझींना फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा फोटो क्लिक केल्याबद्दल त्यांना ओरडले आहे.

व्हिडिओमध्ये श्वेता बच्चनही तिच्या आईसोबत दिसत आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा जया आणि श्वेता पामेला चोप्राच्या निधनानंतर त्यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी आल्या होत्या. या काळात आई आणि मुलगी दोघीही पांढऱ्या सूटमध्ये दिसल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT