jaya bachchan talk about marriage romance in what the hell navya 2 with shweta nanda SAKAL
मनोरंजन

Jaya Bachchan: लग्नानंतर रोमान्स संपतो... जया बच्चन यांचा नातीला सल्ला? श्वेताने दिले प्रत्युत्तर

जया बच्चन तिच्या नातीच्या पॉडकास्ट मुलाखतीत सहभागी झाल्या

Devendra Jadhav

Jaya Bachchan News: बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा जरी चित्रपट जगतापासून दूर असली तरी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या'मुळे चर्चेत आहे.

आता या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. यामध्ये ती तिची आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांच्यासोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.

जया बच्चन यांचा मुलाखतीत खुलासा

जया या मुलाखतीत मुलगी आणि नात दोघींनाही, 'तुम्ही लोकं खूप शिव्या घालता.' असं म्हणते. त्याचवेळी नव्याने तिची आई श्वेता हिला सांगितले की, "मलाही तुझ्यासारखी विनोदबुद्धी मिळाली आहे."

दुसरीकडे गप्पा सुरु असताना जया म्हणताात, " लग्नानंतर रोमान्स खिडकीतून बाहेर जातो. लग्नानंतर रोमान्स पूर्णपणे संपतो." यावर श्वेता म्हणाली, "माझ्या घरात काय सुरु आहे, याची मला कानोकान खबर असते."

पॉडकास्टचा प्रोमो शेअर करताना पोस्टमध्ये एक मजेदार कॅप्शनही दिसले. कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "यावेळी, आमचे संभाषण मस्त झाले आहे. तुम्हाला या अनफिल्टर्ड चर्चेचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले आहे."

नव्याच्या या पॉडकास्टचा नवीन सीझन 1 फेब्रुवारीपासून नव्या नवेली नंदा या YouTube चॅनलवर दिसेल. दर आठवड्याला या पॉडकास्टचा एक भाग सर्वांना पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT