jayant savarkar passed away milind gawali from aai kuthe kay karte emotional post  SAKAL
मनोरंजन

Jayant Sawarkar: तुमच्यासाठी वय हा फक्त एक आकडा, मिलींद गवळींनी जयंत सावरकरांसाठी लिहीलेली पोस्ट चर्चेत

आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी जयंत सावरकरांविषयी केलेली पोस्ट पुन्हा चर्चेत आलीय

Devendra Jadhav

Jayant Sawarkar Milind Gawali News: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालंय. चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे ८८ व्या वर्षा निधन झाले आहे.

अशातच आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी जयंत सावरकरांविषयी केलेली जुनी पोस्ट पुन्हा चर्चेत आलीय.

(Jayant Savarkar passed away milind gawali from aai kuthe kay karte emotional post)

मिलिंद गवळींची पोस्ट

जयंत सावरकर यांनी आई कुठे काय करते मालिकेत तात्या मामांची भुमिका केली. अगदी गेल्या काही भागातच जयंत सावरकर आई कुठे काय करते मालिकेत दिसले होते.

त्यानिमित्ताने आई कुठे काय करते मधील मिलिंद गवळींची एक जुनी पोस्ट व्हायरल होते. मिलिंद गवळी फोटो पोस्ट करुन म्हणाले होते..

अण्णा तू आमच्यासाठी एक प्रेरणा आहेस, वय फक्त एक आकडा आहे हे सांगण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे.. अशी पोस्ट मिलिंद गवळींनी शेअर केली होती.

जयंत सावरकर यांच्या निधनाने हळहळ

जयंत सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.

३० हून अधिक अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.

अखेरच्या दिवसात रुग्णालयात

वेगवेगळ्या भूमिकांसाठी जयंत सावरकर यांची ओळख होती. त्यांनी विनोदी, गंभीर भूमिकांमधून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अभिनेता जयंत सावरकर मागील 15 दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. जयंत सावरकर यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात निर्माण झालेली पोकळी ही भरुन न येणारी आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT