Jeremy Renner Sakal
मनोरंजन

Jeremy Renner: जेरेमी रेनरची अपघातानंतर झालीय अशी अवस्था, रुग्णालयातील फोटो शेअर करत म्हणाला…

जेरेमीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपघातानंतरचा पहिला फोटो देखील शेअर केला आहे. त्‍याने त्‍याच्‍यासाठी प्रार्थना करण्‍यासाठी त्‍याच्‍या चाहत्‍यांचे आणि मित्रांचेही आभार मानले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'मार्वल' स्टार जेरेमी रेनर नुकताच त्याच्या घराजवळील बर्फ साफ करताना गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्याचे मित्र आणि चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी जेरेमीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपघातानंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्‍याने त्‍याच्‍यासाठी प्रार्थना करण्‍यासाठी त्‍याच्‍या चाहत्‍यांचे आणि मित्रांचेही आभार मानले आहेत.

फोटोमध्ये जेरेमी हॉस्पिटलच्या बेडवरून सेल्फी घेताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील जखमांच्या खुणाही फोटोत स्पष्ट दिसत आहेत. फोटो शेअर करण्यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,“तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबाबत धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम.”

जेरेमीने त्याचा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांच्या आणि मित्रांच्या खूप कमेंट्सचा आल्या आहेत. ख्रिस प्रॅट, ख्रिस हेम्सवर्थ आणि ख्रिस इव्हान्ससह त्याच्या अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम सह-कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. प्रॅटने लिहिले, "तुझ्यासाठी प्रार्थना सुरूच आहेत" इव्हान्सने लिहिले की, "टफ एज नेल्स लव्ह यू." हेम्सवर्थ म्हणाले, “स्पीडी रिकव्हरी बडी".

जेरेमीला "छातीत दुखापत आणि ऑर्थोपेडिक जखमा झाल्या आहेत. जेरेमीच्‍या स्पोकपर्सनने त्‍याच्‍या तब्येतीची अपडेट दिली आहे. स्पोकपर्सनने सांगितले की, जेरेमी रेनरवर सोमवारी शस्‍त्रक्रिया झाली आणि अभिनेत्‍याची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे आणि तो आयसीयूमध्‍ये आहे. 'जगभरातील सर्व चाहते जेरेमी रेनरच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहेत, तर सर्व सेलिब्रिटी जेरेमीच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

जेरेमी रेनर हा हॉलिवूडमधला खूप लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, जेरेमी अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, तो अ‍ॅव्हेंजर्सचे सर्व चित्रपट आणि नवीनतम वेब सिरीज 'हॉकआई' मध्ये क्लिंट बार्टन या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. कामाच्या आघाडीवर, रेनर लवकरच 'मेयर ऑफ किंग्सटाउन'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. पॅरामाउंट+ वर हा चित्रपट 15 जानेवारीला प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे-मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! १० दिवसांनंतर 'डेक्कन क्वीन' पुन्हा रुळावर; 'इंटरसिटी'ही आजपासून सुरू

Nagpur News: एसटी प्रवाशांना दिलासा नाही! साध्या बसच्या 10% भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, 1 ऑगस्टपासून पूर्वीचे दर

Latest Marathi News Live Update : काटेवाडीत वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; अजितदादांच्या आठवणीत भरल्या डोळ्यांनी वारकरी पंढरपूरला रवाना

Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

SCROLL FOR NEXT