Jhalak Dikhhla Jaa 10 News esakal
मनोरंजन

प्रतिक्षा संपली ! 'झलक दिखला जा' पाच वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला

आजपासून प्रेक्षकांना 'झलक दिखला जा' पाहाता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jhalak Dikhhla Jaa 10 Grand Premiere : पाच वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर टीव्हीवर 'झलक दिखला जा १०' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सेलिब्रेटी डान्स शोमध्ये यंदा टीव्ही विश्वातील मोठे कलाकार सहभागी होणार आहेत. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), करण जोहर आणि नोरा फतेही हे शोचे परीक्षक आहेत.

चला तर जाणून घेऊया की कोणते कलाकार आपल्या डान्सचे कलाविष्कार दाखवणार आहेत. या व्यतिरिक्त झलक दिखला जा केव्हा आणि कधी पाहात येणार?

३ सप्टेंबरला कार्यक्रम होणार प्रेक्षपित

'झलक दिखला जा १०' (Jhalak Dikhhla Jaa 10) टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. जो ३ सप्टेंबर म्हणजे आजपासून सुरु होत आहे. प्रोमो पाहिल्यानंतर चाहते खूपच आनंदी झाल्याचे दिसत आहेत. या शोमध्ये टीव्हीवरील दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. शोचे सूत्रसंचालन मनीष पाॅल करणार आहे. जो आपल्या गंमतीदार अंदाजाने शोत मनोरंजन करताना दिसेल. ( TV Entertainment News)

या कलाकारांमध्ये होणार डान्सची टक्कर

झलक दिखला जा १० मध्ये टीव्ही विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार एकाच मंचावर दिसणार आहेत. यात निया शर्मा, रुबिना दिलैक, गमशीर महाजनी, शिल्पा शिंदे, अली असगर, फैजल शेख, नीती टेलर, धीरज धूपर, पारस कलनावत, सेलिब्रिटी शेफ जोरावर कालरा आणि अमृता खानविलकर हे कलाकार आपली नृत्याची अदा दाखवण्यात तयार आहेत.

हा शो आजपासून सुरु होत आहे. आपण तो प्रत्येक शनिवार-रविवारी ८ वाजता कलर्स वाहिनीवर पाहू शकता. या व्यतिरिक्त शो व्हूट अॅप आणि जिओ टीव्हीवरही पाहाता येऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT