Jhalak Dikhhla Jaa 11 who is winner esakal
मनोरंजन

Jhalak Dikhhla Jaa 11 Winner : ग्रँड फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव आलं समोर, कुणी मारली बाजी?

झलक दिखला जा च्या ११ व्या सीझनच्या विजेत्याचं (Jhalak Dikhhla Jaa 11 Winner) नाव आता चर्चेत आलं असून त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Jhalak Dikhhla Jaa 11 Winner : टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या रियॅलिटी शो नं चाहत्यांना जिंकून घेतले आहे त्या झलक दिखला जा चा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. मात्र त्यापूर्वीच काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन विजेत्याचे नाव समोर आल्यानं नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

आता झलक दिखला जा या मालिकेचा अकरावा सीझन सुरु आहे. बऱ्याच दिवसांपासून या मालिकेच्या ग्रँड फिनालेची चर्चा सुरु होती. अखेर तो क्षण आता जवळ आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २ फेब्रुवारी रोजी त्याचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. यावेळी ग्रँड फिनालेमध्ये सारा अली खान, विजय वर्मा, हुमा कुरेशी सहभागी होणार आहेत.

या सगळ्यात अशा चर्चेला उधाण आले आहे की, यावेळी विजेता म्हणून दुसरी कुणी नव्हे तर ज्यांनी वाईल़्ड कार्डद्वारे इंट्री केली आहे त्यानं बाजी मारल्याचे दिसून आले आहे. खरचं जर तसं झालं तर तो या मालिकेच्या ग्रँड फिनालेमधील इतिहास असणार आहे. मागील तीन महिन्यांपासून हा शो सुरु असून त्याची जोरदार चर्चा आहे.

सध्या टॉप तीन स्पर्धकांची नावं पाहायची झाल्यास त्यात अद्रिजा सिन्हा, शोएब इब्राहिम आणि मनिषा राणी यांच्या नावाचा समावेश आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, त्यात मनिषानं शेवटच्या राउंडमध्ये बाजी मारुन ती ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. मनीषा ही अकराव्या सीझनची विजेती असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात हे सगळं सोशल मीडियावरील चर्चांमधून आलेलं नाव आहे. विजेत्याचं नाव ग्रँड फिनालेच्या दिवशी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अजून त्या नावावर अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारे शिक्कामोर्तब झालेलं नाही. उद्या या रियॅलिटी शो चा ग्रँड फिनाले होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विजेत्याचे नाव समोर आल्यानं चाहत्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या नावांनुसार मनिषा राणीनं ती ट्रॉफी आपल्या नावावर केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT