jhimma 2 box office collection day 2  SAKAL
मनोरंजन

Jhimma 2 Box Office: पुन्हा एकदा महिलांनी बाजी मारली, झिम्मा २ चं बॉक्स ऑफीसवर विक्रमी कलेक्शन

झिम्मा २ ने अल्पावधीतच बॉक्स ऑफीसवर विक्रमी रेकॉर्ड केलाय

Devendra Jadhav

झिम्मा २ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या महिन्याभरापासुन झिम्मा २ ची सर्वांना उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा शुक्रवारी २४ नोव्हेंबरला रिलीज झाला.

झिम्मा २ पाहण्यासाठी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. याचाच परिणाम झिम्मा २ च्या बॉक्स ऑफीसवर दिसुन आला. झिम्मा २ ने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केलीय. पाहूया कमाईचे आकडे.

(jhimma 2 box office collection day 2)

झिम्मा २ चं विक्रमी बॉक्स ऑफीस कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार झिम्मा २ च्या बॉक्स ऑफीस कलेक्शनच्या आकड्यांकडे नजर मारली तर सिनेमाने पहिल्या दिवशी १.२० कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ झालेली दिसत असुन झिम्मा २ ने २.२५ कोटी कमावले. त्यामुळे झिम्मा २ ने दोन दिवसातच ३ कोटींहून अधिकची कमाई केलीय.

झिम्मा 2 मध्ये तगड्या कलाकारांची फौज

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका आहेत

झिम्मा 2 सुपरहिट होणार?

महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना झिम्मा 2 आवडलेला दिसतोय. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत हेमंत ढोमे दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. झिम्माचा पहिला भाग कोवीडच्या नंतर रिलीज होऊन सुपरहिट झाला. झिम्मा 2 सुद्धा सुपरडुपरहिट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT