Jhimma Marathi Movie  esakal
मनोरंजन

Jhimma 2 Marathi Movie : दसऱ्याचा शुभमुहूर्त साधला, ‘झिम्मा 2’ नव्यानं समोर आला! पोस्टर आऊट

रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे. पण या दोघींची पात्रं काय आहेत आणि ती या कथेत काय रंग भरणार यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

युगंधर ताजणे

Jhimma Marathi Movie : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ चित्रपटाच्या मेकर्सनं प्रेक्षकांना, चाहत्यांना पुन्हा एकदा सरप्राईज दिले आहे. झिम्मा २ चे पोस्टर समोर आले असून त्याला सोशल मीडियावरुन चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तूत, चलचित्र मंडळी निर्मित आगामी मराठी चित्रपट झिम्मा २ चे मोठया जोमाने प्रमोशन सुरु झाले असल्याचे दिसुन येत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी २४ नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज होत असल्याची घोषणा करताच सोशल  मीडियावर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यात भर म्हणजे आज दसऱ्याच्या शुभ दिवशी चित्रपटाचा पहिलं पोस्टर आउट करण्यात आला आहे, ज्यात चित्रपटातले सर्व कलाकार दिसत आहेत!

सुपरहिट चित्रपट झिम्मा नंतर आता पुनः नव्या पोस्टर मधून आपल्या सगळ्या आवडत्या कलाकारांचा धम्माल लूक बघून प्रेक्षक मोठया पडद्यावर या सगळ्यांना भेटण्यास आतुर झाले आहेत. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांच्या बरोबरीने आणखी दोन प्रसिध्द चेहरे ह्या तगड्या कलाकारांच्या टोळीमध्ये सामील झाले आहेत.

ते म्हणजे रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे. पण या दोघींची पात्रं काय आहेत आणि ती या कथेत काय रंग भरणार यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बॉक्स ऑफिस वर यशस्वी छाप पाडत झिम्मा ने प्रेक्षकांच्या मनात घर तर केले आहे  परंतु त्याच बरोबर मायबाप प्रेक्षकांची मागणी बघता दिग्दर्शक हेमंत ढोमे यांना ह्याच चित्रपटाचा सिक्वेल आणण्यास ही प्रवूत्त केले आहे. आज झिम्मा2 साठी प्रेक्षकांची उत्सुकता बघता हेमंत ढोमे म्हणाले कि, “पहिल्या भागाला लोकप्रियता मिळाली म्हणून दुसरा भाग करूया असं कधीच ठरलं नव्हतं.

पहिल्या भागाची कथा पुढे नेताना रियूनियन ची मजा सापडली आणि हा चित्रपट करायचं ठरलं! लोकांनी कथेवर, त्यातल्या पात्रांवर भरभरून प्रेम केलं त्यामुळे या पात्रांना पुन्हा तितक्याच सहजतेने सादर करण्याची जबाबदारी होती. पण माझ्या संपुर्ण टीमने झिम्मा २ मजा घेत आणि आपलेपणाने बनवला आहे, मला खात्री आहे आमचा हा आपलेपणा, साधेपणा प्रेक्षकांनाही आपलंसं करेल.”

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित "झिम्मा2" पुन्हा एकदा आनंदाचा खेळ खेळायला, पुर्नःभेटीचा अविस्मरणीय अनुभव द्यायला 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहांत दाखल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT