jhimma 2 marathi pori song out now rinku rajguru nirmiti sawant sayali sanjeev shivani surve  SAKAL
मनोरंजन

Jhimma 2 Marathi Pori Song: "मराठी पोरी दुनियेला दाखवतील माज" झिम्मा 2 मधलं पहिलं धम्नाल गाणं बघाच

झिम्मा 2 मधलं पहिलं धम्माल गाणं भेटीला, क्लिक करुन तुम्हीही बघा

Devendra Jadhav

Jhimma 2 Marathi Pori Songs: झिम्मा 2 चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपुर्वी चित्रपटाचा टीझर भेटीला आला. याशिवाय झिम्मा 2 चं पहिलं गाणं कधी भेटीला येणार याचीही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अशातच झिम्मा 2 मधलं पहिलं गाणं भेटीला आलंय. या गाण्याचं नाव आहे मराठी पोरी.

मराठी पोरी हे झिम्मा 2 मधलं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. हे धम्माल गाणं तुम्हाला थिरकायला भाग पाडेल यात शंका नाही. काय आहे हे गाणं? वाचा सविस्तर.

'इंदू'च्या ७५व्या वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन असून यात प्रत्येकीचा जबरदस्त स्वॅग दिसत आहे. ‘मराठी पोरी' हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एकंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत या गाण्यातून सांगितली आहे.

तसेच कलाकारांच्या पार्टी थिम ड्रेसने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. 'मराठी पोरी' हे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच ते डोळ्यांनाही सुखावणारे आहे. अतिशय एनर्जीने भरलेले हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.

झिम्मा 2 चित्रपटातील पार्टी अॅंथम 'मराठी पोरी' हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी हे गाणं गायलंय. या गाण्यात चित्रपटातले सर्व कलाकार धम्माल नाचताना दिसत आहेत.

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT