jhimma 2 movie reaction by hemangi kavi siddharth chandekar sayali sanjeev  SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: "एखादा भाग फसेल! ठिक आहे पण...", झिम्मा २ पाहून हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

झिम्मा २ सिनेमा पाहुन हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केलीय. हेमांगी काय म्हणाली बघा

Devendra Jadhav

Jhimma 2 Movie Hemangi Kavi: सध्या महाराष्ट्रात एका मराठी सिनेमाने धुमाकुळ घातलाय. हा सिनेमा म्हणजे झिम्मा २. या सिनेमाला सध्या प्रेक्षकांचं मोठं प्रेम मिळत आहे.

लहानांपासुन मोठ्यापर्यंत ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण झिम्मा २ चा आनंद घेत आहेत. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने झिम्मा २ खास पोस्ट लिहीली आहे.

हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.

हेमांगी झिम्मा २ पाहुन लिहीते, "मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली! हेमंत ढोमे अरे काय कमाल सिनेमा आहे! Frankly speaking झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही झिम्मा १ पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि relatable! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीन न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड enjoy केला मी हा सिनेमा!"

हेमांगी पुढे लिहीते, "निर्मीती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस? आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला lead किंवा Heroine म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच categories करतो. Hollywood किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना Lead म्हणूनच पाहीलं जातं. Awards साठी main category मध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तु कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू!

सुहास ताई, हीच गोष्ट ‘तु तिथं मी’ च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो line मारायचा scene! मी तर शिट्टीच हाणली theatre मध्ये. क्या बात है!"

हेमांगी शेवटी लिहीते, "रिकुचं दुसरं कौतुक करावंसं वाटतं. खुप समजून- उमजून काम केलंय. Typical सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. Screen वर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर smile येत होतं. थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए!

एक एक scene चोपलाय तिघींनी!

जाता जाता एवढंच सांगेन हेमंत ढोमे आता आम्हाला झिम्मा ३ हवाय. हवाय म्हणजे हवायययययय! ते तू बाकी सिनेमे करत रहा पण झिम्मा universe ला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा part फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्या सगळ्या team कडे. इरावती कर्णिक - क्षितीज पटवर्धन कमाल कमाल! कमाल!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT