jhimma 2 release date revealed directed by hemant dhome sayali sanjeev sonalee kulkarani  SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: पुढच्या ट्रिपची तारीख ठरली, आनंदाची गाडी सुटली!, 'झिम्मा २' ची रिलीज डेट जाहीर

हेमंत ढोमेने आज सोशल मिडीयावर झिम्मा 2 ची रिलीज डेट जाहीर केलीय

Devendra Jadhav

२०२१ ला आलेल्या झिम्मा सिनेमाने सर्वांची मनं जिंकली. सिनेमाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. झिम्मा सिनेमा जेव्हा संपला तेव्हा दिग्दर्शकाने झिम्मा 2 ची घोषणा केली होती.

आता झिम्मा 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हेमंत ढोमेने सोशल मिडीयावर पोस्ट करुन ही खास माहिती शेअर केली.

(jhimma 2 release date revealed directed by hemant dhome sayali sanjeev sonalee kulkarani)

मराठीतील बहुप्रतिक्षित सिक्वेल झिम्मा 2 ची आज तारीख जाहीर झाली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट रिलीज करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर पोस्ट करत निर्मात्यांनी असे म्हंटले आहे की, “पुढच्या ट्रीपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात”

कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित ह्या चित्रपटात तगड्या आणि लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे ज्यात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांचा समावेश आहे.

यंदा झिम्मा २ चं वैशिष्ट्य म्हणजे या कलाकारांच्या टीम मध्ये काही नवीन सदस्य ही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे नवीन कलाकार सुद्धा झिम्मा २ मध्ये बघायला मिळणार आहेत.

"झिम्मा2" पुन्हा एकदा आनंदाचा खेळ खेळायला, पुर्नःभेटीचा अविस्मरणीय अनुभव द्यायला 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहांत दाखल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT