Jhimma 2 superhit hemant dhome special announcement for audience SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: आपल्या सर्व मागण्यांचा विचार करुन... झिम्मा २ सुपरहिट होताच हेमंत ढोमेची नवीन घोषणा

हेमंत ढोमेने पोस्ट करुन एक खास घोषणा केलीय

Devendra Jadhav

झिम्मा २ सिनेमा शुक्रवारी २४ नोव्हेंबरला रिलीज झालाय. झिम्मा २ पाहायला थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी करत आहे. लहानांपासुन मोठ्यांपर्यत सर्वांना झिम्मा २ आवडतोय.

झिम्मा २ चं लेखन - दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलंय. झिम्मा २ ला होणारी हाऊसफुल्ल गर्दी पाहताच हेमंंत ढोमेने नवीन घोषणा झालीय.

(Jhimma 2 superhit hemant dhome special announcement)

झिम्मा २ साठी हेमंत ढोमेची नवीन घोषणा

हेमंत ढोमेने पोस्ट करुन लिहीलंय की, संपुर्ण महाराष्ट्रातून ग्रुप बुकींगसाठी खूप सारे मेसेजेस सोशल मिडीयावर येत आहेत. आम्हाला सुद्धा तुम्हाला तुमच्या शहरात येऊन भेटायचं आहे! तुमच्या इतकेच आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. हे सारं जरा सोपं आणि सोयीचं करण्यासाठी या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.

आपल्या सर्व मागण्यांचा 100 टक्के विचार केला जाणार याची खात्री मी तुम्हाला देतो! झिम्मा 2 वर तुम्ही करत असलेल्या हाऊसफुल्ल प्रेमासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो!

अशाप्रकारे पुढे हेमंत ढोमेने बुकींगसाठी नंबर शेअर केलाय.

झिम्मा २ चं विक्रमी बॉक्स ऑफीस कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार झिम्मा २ च्या बॉक्स ऑफीस कलेक्शनच्या आकड्यांकडे नजर मारली तर सिनेमाने पहिल्या दिवशी १.२० कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ झालेली दिसत असुन झिम्मा २ ने २.२५ कोटी कमावले. याशिवाय नवीन अपडेट लक्षात घेता झिम्मा २ ने तीन दिवसातच ५ कोटींहून अधिकची कमाई केलीय.

झिम्मा 2 मध्ये तगड्या कलाकारांची फौज

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT